Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, फेब्रुवारी २७, २०१९

चंद्रपूर:43 तलाठी पदासाठी ऑनलाइन भरतीप्रक्रिया 1 मार्चपासून

चंद्रपूर/प्रतिनिधी:
Image result for तलाठी
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी तलाठी पदाच्या रिक्त पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने भरती प्रक्रिया 1 मार्च पासून सुरू होणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यासाठी देखील या पदासाठी एकूण 43 जागा असून 1 ते 22 मार्च या कालावधीमध्ये ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.

राज्यात एकाच वेळी तलाठी पदासाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या संदर्भातील जाहिरात देण्याचे निर्देश राज्य शासनाकडून जिल्हा प्रशासनाला आले असून चंद्रपूर जिल्ह्यासाठी महापरीक्षा पोर्टल मार्फत राज्यातील गट क संवर्गातील तलाठी पदांसाठी सरळ सेवा भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. नव्या आरक्षणाच्या तरतुदीसह एकूण 43 जागा जिल्ह्यामध्ये भरावयाच्या असून या पदासाठी महापरीक्षा पोर्टल मार्फत विवरणपत्र भरून द्यायचे आहे. त्या त्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांकडून 1 ते 22 मार्च या कालावधीमध्ये महापरीक्षा पोर्टल च्या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. यासाठी सर्व परीक्षार्थींनी महापरीक्षा पोर्टलच्या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.