जिवती /प्रतिनिधी:
दि. 03/01/2019 ला भाजपा तालुका पदाधिका-यांची बैठक लोकसभा विस्तारक खुशाल बोंडे यांचे अध्यक्षतेत पार पडली या बैठकीला अनु. जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे सोबत विधानसभा विस्तारक सतिश दांडगे, किसान मोर्चाने महामंत्री राजु घरोटे, भाजपा ता. अध्यक्ष केशव गिरमाजी, जि.प. महिला व बालकल्याण सभापती केंद्रेताई, भाजपा तालुका महामंत्री सुरेशजी केंद्रे, पं.स. सभापती सुनिल मडावी, उपसभापती महेश देवकते व भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.
खुशाल बोंडे यांनी तालुक्याचा आढावा घेवून पक्ष संघटन मजबुत करण्यासाठी पक्ष कार्यकर्ते व पदाधिका-यांना शिल्लक राहिलेली सर्व कामे येणा-या पांच-दहा दिवसात पूर्ण करण्याच्या सुचना केल्या तर भाजपा भाजपा अुन. जाती मोर्चा चे जिल्हाध्यक्ष विजय वानखेडे यांनी पक्ष संघटन करीत असतांना ‘‘सबका साथ, सबका विकास’’ या धर्तीवर अनु. जाती मोर्चाचे मोठे योगदान असून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीने केला असून त्या अनुशंगाने आपल्याला कार्य करावयाचे असल्याचे मत व्यक्त केले.
सर्व पदाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली जिवती येथील प्रल्हादजी मदणे यांची एकमताने भाजपा तालुका अनु. जाती मोर्चा अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर महामंत्री अंगत गायकवाड, सहमहामंत्री किसन पंडीत कांबळे, उपाध्यक्ष संभाजी रायवाड, सौ. इंदिरा काकडे तर सचिवपदी त्रंबक सुर्यवंशी, सदस्य म्हणून नामदेव तोग्र, विश्वनाथ कंसकटले, रावसाहेब काकडे, बालाजी कोलेकर, सुभाष कांबळे, भानुदास बटवाडे, सौ. पार्वताबाई गवाले, अनिल काटे, अशोक सुर्यवंशी, भगवान मसुरे, गुलाब जिवणे, गुलाब सदाशिव राजपंगे, अनंत सुर्यवंशी व केशव गवाले यांची निवड करण्यात आली.
या नियुक्तीबाबत ना. हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्री, ना. सुधीरभाऊ मुनंगटीवार, अर्थ, नियोजन व वने मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, राजुराचे आमदार अॅड. संजय धोटे, आमदार नानाजी शामकुळे, भाजपा जिल्हाध्यक्ष हरिश शर्मा, जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळे आदी मान्यवरांनी स्वागत केले आहे.