Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शनिवार, डिसेंबर २२, २०१८

‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’



नागपूर :
स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी युवा विदर्भवाद्यांनी पुढाकार घेत शनिवारी ‘सायलेंट मार्च फॉर विदर्भ’ आयोजित करून स्वतंत्र विदर्भ राज्याचा आवाज पुन्हा एकदा बुलंद केला. संविधान चौक ते यशवंत स्टेडियमपर्यंत काढण्यात आलेल्या या सायलेंट मार्चमध्ये विविध संघटनांच्या प्रतिनिधींसह नागपूरकर उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.   संविधान चौक येथून दुपारी ३ वाजता हा मार्च निघाला. तत्पूर्वी संविधान चौक येथे स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसंदर्भात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. येथे एक सेल्फी पॉईंट होता. यात सायलेंस मार्च फॉर विदर्भ लिहिलेले असून त्यासमोर सेल्फी काढण्यासाठी नागपूरकरांनी गर्दी केली होती. तसेच स्वाक्षरी अभियानही राबवण्यात आले. यासोबतच विदर्भ राज्याबाबत आपल्याला काय वाटते, ते एका पेपरवर लिहून द्यावयाची आगळीवेगळी मोहीमह राबवण्यात आली. यातही नागपूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यानंतर हा मार्च निघाला. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.