Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर २९, २०१८

विध्यार्थ्यांना मोफत बस पासेसचे वाटप

 राकेश पुनसह भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती
गोंडपिपरी :-

      चालू सत्रात पडलेल्या दुष्काळामूळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे.परिणामी गोंडपिपरी तालुक्याचा समावेश राज्यभरातील दुष्काळसदृश्य १८० तालुक्यामध्ये करण्यात आला आहे.यामुळे जमीन महसुलात सूट,सहकारी कर्जाचे पुनर्गठन,शेतीशी निगडित कर्जाच्या वासलूलीला स्थगिती,कृषी पंपाच्या चालू वीजबिल ३३.५०% सूट,शालेय विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्कात माफी यासह एस.टी. महामंडळाच्या बसने आता विद्यार्थ्यांना मोफत प्रवास करता येणार आहे.
         राज्यातील दुष्काळसदृश्य भागाच्या सर्वेअंती १८० तालुक्याची यासाठी निवड करण्यात आली.त्यात गोंडपिपरी तालुक्याचा देखील समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्या वने आणि महसूल विभागांतर्गत शासन निर्णय क्रमांक एससीवाय - २०१८/प्र. क्र.८९/म-७,दिनांक २३ ऑक्टोबर २०१८, अन्वये बऱ्याच योजनांसोबतच अनेक बाबतीत शिथिलता लागू करण्यात आली आहे.याचाच एक भाग म्हणून नुकतेच गोंडपिपरी तालुक्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना मोफत पासेसचे वाटप करण्यात आले आहे.यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर,राजुरा विधानसभेचे आमदार संजय धोटे यांचे प्रयत्न राहिले.भाजयुमोचे जिल्हा सचिव,नगरसेवक राकेश पुन,विध्यार्थी संघटनेचे तालुकाध्यक्ष गौरव वासेकर, सुनील फुकट यांच्या उपस्थितीत विध्यार्थ्यांना पासेसचे वाटप करण्यात आहे.यानंतर्गत शैक्षणिक, तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मासिक बस पास योजनेचा समावेश आहे.पूर्वी महामंडळाकडून ६६.६७% अनुदान देऊन उर्वरित ३३.३३% रक्कम विद्यार्थ्यांकडून घेण्यात येत होती. मात्र शासनाच्या वरील धोरणानुसार नोव्हेंबर २०१८ पासून तर एप्रिल २०१९ पर्यंत विद्यार्थ्यांना १००% अनुदानावर प्रवास करता येणार आहे.सोबतच दुष्काळसदृश्य स्थितीत तालुका असल्याने इतरही बाबीची माहिती अवगत करून घेऊन उपरोक्त योजना आणि सबसिडीचा लाभ घेण्याचे आव्हाहन राकेश पुन यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.