Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, नोव्हेंबर ३०, २०१८

केंद्र व राज्य शासनाच्या मंत्र्यांची फ्लाय ॲश दालनाला भेट

नागपूर/प्रतिनिधी:
 नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देणारे इंडियन रोड कॉग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन २२ ते २५ नोव्हेंबर दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, मानकापूर, नागपूर येथे संपन्न झाले. या अधिवेशनात देश-विदेशातील नामांकित शास्त्रज्ञ, तज्ज्ञ, अभियंते, कंपन्या, उद्योजक, कंत्राटदार व आय.आर.सी. प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

औष्णिक विद्युत केंद्रातून निघणाऱ्या राखेची उपयोगिता वाढविणे, राखेवर आधारित विविध उत्पादनांसाठी पुढाकार घेणे, सिमेंट उद्योग, महामार्ग रस्ता उभारणी, माफक दरात घरबांधणी तसेच पायाभूत सोयी सुविधा कामांमध्ये राखेचा वापर व्हावा याबाबतची नाविन्यपूर्ण माहिती देणारे दालन महाराष्ट्र राज्य राख परिषदेतर्फे ह्या अधिवेशनात उभारण्यात आले होते. राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जामंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष पुढाकाराने राख वापरासंबंधीचे धोरण-२०१६ तयार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करीता महाराष्ट्र राज्य राख परिषदेची स्थापना झाली आहे, हे विशेष.

केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक मंत्री  नितीन गडकरी, सा.बां मंत्री चंद्रकांत पाटील, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार, सा.बां राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील तसेच केंद्रीय व इतर राज्यांच्या मंत्र्यांनी तसेच मान्यवरांनी सदर दालनाला भेट दिली व  राखेवर आधारित नवनवीन उत्पादनांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी महाजेम्सचे व्यवस्थापकीय संचालक पुरुषोत्तम जाधव, महाजेम्सचे संचालक सुधीर पालीवाल व  महानिर्मिती-महाजेम्सचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. फ्लाय अॅशपासून निर्माण होणाऱ्या विविध वस्तूंचे प्रदर्शन हे या अधिवेशनाचे विशेष आकर्षण ठरले.

सदर दालनामध्ये महानिर्मिती राख व्यवस्थापन कंपनी मर्यादित (महाजेम्स) मार्फत फ्लाय अॅश आधारित नाविन्यपूर्ण उत्पादने ठेवण्यात आली होती. जसे स्टील फायबर री-इनफोर्सड कॉक्रीट कुंपण भिंत व सांडपाण्याची नाली( Precast Panel & Drains from Steel Fiber  reinforced concrete), फर्निचर शीट, ईपीएस पॅनल(EPS panel), जीओ पॉलिमर कॉक्रीट व कृत्रिम रेतीचे नमुने (artificial sand sample) व ए.ए.सी. लाईट वेट ब्लॉक  (AAC light weight bricks), माती मिश्रित विटा(clay fly ash bricks) इत्यादींचा प्रामुख्याने समावेश होता.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.