Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, नोव्हेंबर १५, २०१८

नि:शुल्क उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम

Image result for उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमचंद्रपूर/प्रतिनिधी:
 मिटकॉन कन्सलटंसी अँड इजिनियरिंग सर्व्हीसेस लिमिटेड चंद्रपूर व उद्योग संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील अनुसूचित जमातीतील युवक व युवतींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर विशेष सामुहिक प्रोत्साहन योजने अंतर्गत 18 दिवसीय निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम नि:शुल्क स्वरूपात राबविण्यात येत आहे. 
सदर प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती अनुसूचित जमातीच्या उमेदवरांना देण्याचा उद्देशाने ए‍क दिवसीय उद्योजकता परिचय मेळाव्याचे आयोजन दिनांक 22 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता, समाजकल्याण सभागृह, शासकिय दुध डेअरी समोर, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे करण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमात उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, उद्योग उभारणी, विविध क्षेत्रातील उद्योगसंधी, उद्योगांना भेटी,उद्योग निवढ प्रक्रिया, विक्री व व्यवस्थापन कौशल्य, उद्योगाला लागणारे विविध नोंदणी व परवाने निधी उभारणीकरीता केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये दिल्या जाणार आहे.
तरी इच्छुक उमेदवारांनी नोंदणीकरीता मुख्य प्रशिक्षक, 9822707848, मिटकॉन कन्सलटंसी अँड इजिनिअरिंग सर्व्हीसेस लिमिटेड, चंद्रपूर द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग भवन, चंद्रपूर येथे संपर्क साधावा असे आवाहन महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, चंद्रपूर यांनी केलेले आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.