Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑक्टोबर ०२, २०१८

नागपूरच्या आमदाराचा राजीनामा


  • काटोलचे आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा 
  • सेवाग्रामकडे प्रस्थान
  • कॉंग्रेसमध्ये प्रवेशाची शक्‍यता

संबंधित इमेजनागपूर/प्रतिनिधी:
२ ओक्टोंबर गांधी जयंतीच्या मुहूर्तावर भारतीय जनता पक्षाचे काटोलचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी विधानसभेचा राजीनामा दिला आहे. मागील काही दिवसांपासून ते भारतीय जनता पक्षाच्या धोरणावर सातत्याने टीका करीत होते. त्यांनी विधानसभा सदस्यपदाचा राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना ई-मेल व फॅक्‍सने पाठविला आहे. 2 ऑक्‍टोंबर 2018 दुपारपासून राजीनामा ग्राह्य धरावा असे त्यांनी नमूद केले आहे. उद्या विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांना प्रत्यक्ष भेटून ते राजीनामा सोपविणार आहे.
राजीनामा पाठवून डॉ. आशिष देशमुख यांनी सेवाग्रामकडे प्रस्थान केल्याची माहिती मिळाली असून ते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्ती कार्यकर्त्यांना दिली.
21 सप्टेंबर रोजी काटोल फेस्टिव्हल दरम्यान भाजपचे नेते तथा खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांना पक्षाचा राजीनामा देऊ नये असा सल्ला दिला होता. या कार्यक्र मादरम्यान आशिष देशमुख राजीनामा देऊ शकतात असे मत व्यक्त करण्यात येत होते. मात्र त्यावेळी राजीनामा नाट्याला विराम मिळाला होता. याच मंचावर आम आदमी पार्टीचे राज्यसभा सदस्य संजय सिंग व आपच्या प्रवक्‍त्या प्रीती मेनन उपस्थित होत्या.

(http://khabarbat.in) लवकरच येणार वाचकांच्या सेवेत..




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.