Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, ऑक्टोबर २८, २०१८

वर्धा जिल्ह्यात दुष्काळ घोषित करा

Declare drought in entire district | संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ घोषित करावर्धा/प्रतिनिधी:
शासनाने जिल्ह्यातील कारंजा (घाडगे), समुद्रपूर व आष्टी तालुक्यांमध्ये दुष्काळ केला आहे. मात्र हा दुष्काळ वर्धा  जिल्ह्यातील तीनच तालुक्यातील नसून संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती हि बिकट आहे. यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळ सदृष्य स्थिती आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. कमी झालेले पर्जन्यमान यामुळे वर्धा जिल्हयामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यापैकी वर्धा हा एक जिल्हा असून पाणी टंचाईमुळे परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते परिणामी सामान्य नागरिक व शेतकरी संकटात सापडलेला आहे.राज्यातील तालुक्यांच्या यादीमध्ये वर्धा जिल्हयातील वर्धा, सेलू, देवळी, हिंगणघाट व आर्वी तालुक्यांचा दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये समावेश करावा, सोबतच संपुर्ण वर्धा जिल्हयात दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती खासदार रामदास तडस यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.