Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, ऑक्टोबर १८, २०१८

लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

बेटी बचावो, बेटी बढाओ’ ही आमची प्राथमिकता व जबाबदारी:हंसराज अहीर
चंद्रपूर/प्रतिनिधी:
तेलगू भाषीक बांधवांचा अत्यंत महत्वपूर्ण सण बतुकम्मा महोत्सवाचे आयोजन डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी तेलुगू हायस्कुल, लालपेठ काॅलरी, चंद्रपूर येथे दि. 16 आॅक्टोंबर 2018ला बतुकम्मा महोत्सव कमीटीच्या वतीने करण्यात आला. 
बतुकम्मा महोत्सवात उपस्थिती तेलुगू भाषिक बंधु-भगीनींना संबोधित करतांना केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी मान. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केलेली घोषणा केवळ घोषणा नसुन आम्हा सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी म्हणून आम्ही सतत प्रयत्नरत राहू. 
भारतीय जनता पार्टीने तेलंगना प्रदेशाची प्रभारी म्हणून जबाबदाीर दिल्यावर मला तेथील संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला व त्यातुनच या बतुकम्मा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन ना. अहीर यांनी केले. चंद्रपूर क्षेत्रात लाखोंच्या संख्येने तेलुगू भाषीक वास्तव्यास असून तेलगू भाषीक भगीनींचा हा सण दरवर्षी साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. 
तेलंगणाचे आमदार किशन रेड्डी यांनी आपल्या भाषणात तेलुगू भाषीकांसाठी इतक्या तळमळीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ना. अहीर यांचे आभार मानत आम्ही हैदराबाद मध्ये देखील इतका भव्य व सुंदर कार्यक्रम बतुकम्मा महोत्सव आयोजित करू शकत नसल्याची कबुली दिली. त्यांनी उपस्थित तेलुगू महिलांना बतुकम्मा महोत्सवासाठी आणखी तयारी करण्याचे आवाहन करीत पुढील वर्षी तेलंगणातुन महिलांचा बतुकम्मा समुह व फिल्म इंडस्ट्रीजची सेलीब्रिटी आण्याचे आश्वासन दिले. 
या कार्यक्रमात आ. नानाजी शामकुळे यांनी देखील तेलुगू भाषीकांना प्रोत्साहन पर भाषण देत बतुकम्मा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी इत्यादी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. 
या कार्यक्रमास उपमहापौर अनिल फुलझेले, श्रीधर रेड्डी, दिनकर पावडे, मोहन चैधरी, नगरसेविका कल्पना बागुलकर, ज्योती गेडाम, माया उईके, शिला चव्हाण, निलम आक्केवार, नगरसेवक संदीप आवारी, उपक्षेत्रिय प्रबंधक हलदर, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, सतिश तिवारी, दिनकर पावडे, बतुकम्मा कमेटीचे अध्यक्ष तथा मनपा झोन सभापती श्याम कनकम, सदस्य संजय मिसलवार, राजेश तिवारी, श्रीनिवास रंगेरी, राजू कामपेल्ली, रामलु भंडारी, राजेश कोमल्ला, रामस्वामी पुरेड्डी, श्रीनिवास येरकल, श्रीनिवास झुनझुल, कुमार इदनुरी, रमेश मोकनपेल्ली, क्रिष्णा कारंगल, राजेश मिष्ठा, तिरूपती बुडदी, भुमन्ना दोम्मटी, गट्टया जुपाका, सारया पोटला, सुनिल मिसलवार, सीनु मेकला, महादेव अरेनार, तेजा सिंग, सुरेश गोलीवार, नरेश पुजारी, भानेष चिलमील, कृणाल गुंडावार, पराग मलोडे, संदीप आगलावे, आकाश लख्खाकुला, शैलेश दिंडेवार व लालपेठ परिसरातील बहुसंख्य तेलुगूभाषीक नागरिकांची उपस्थिती होती.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.