Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

अहिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अहिर लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑक्टोबर १९, २०१८

 हंसराज अहीर यांच्या हस्ते प्लास्टीक चाचणी केंद्र व कॅड केंम लॅबचे उद्घाटन

हंसराज अहीर यांच्या हस्ते प्लास्टीक चाचणी केंद्र व कॅड केंम लॅबचे उद्घाटन

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
सेंट्रल आॅफ प्लास्टीक इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नोलाॅजी (सिपेट), रसायन आणि उर्वरक विभाग, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत चालणारे राष्ट्रीय दर्जाचे केंद्र असुन ISO 9001:2008 QMS,ISO/IEC 17025,ISO/IEC 17020 प्रत्यायनाने प्रमाणित आहे. 
सिपेट संस्था प्लास्टीक अभियांत्रिकी आणि तंत्राज्ञान क्षेत्रात 1968 मध्ये स्थापन झाली आणि आता भारतातील 32 शहरा मध्ये कार्यरत आहे. सिपेट संस्था ही शैक्षणिक, तंत्रा सहायक सेवा, संशोधन आणि संबंधित उद्योगांच्या विकासासाठी समर्पित आहे. 
सिपेट चंद्रपूर हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकार कडून रू. 51.32 कोटी मंजूर करण्यात आले आहे. ज्यामध्ये भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने 50ः50 शेअर आधारावर संस्थेचे बांधकाम आणि तांत्रिक उभारणीकरिता मजूरी मिळाली आहे. 
महाराष्ट्र शासनाकडून औद्योगिक क्षेत्रातील चंद्रपूर येथे सिपेटचे केंद्र स्थापेनसाठी 15 एकर जमीन विनामूल्य मिळाली आहे आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाद्वारे 25.66 कोटी रूपयांची तरतूद केली आहे. 
सद्यस्थितीत सिपेटचे प्रशिक्षण कार्य प्लाॅट नं. 107/43, चैहान काॅलनी, तीर्थरूप नगर, वेकोलि क्वार्टर, चंद्रपूर येथे भाडयाने घेतलेल्या जागेवर प्रगतीपथावर सुरू आहे. संस्थेत उच्चस्तरीय साॅफ्टवेअर असलेल्या कॅटीया, युनिग्राफिक्स, मास्टरकॅम इत्यादीसह परिष्कृत प्लास्टीक चाचणी यंत्राणा आणि संगणक सहाय्यक डिझाइन प्रयोगशाळेसह प्लास्टीक चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन आज दि 18 आॅक्टोंबर 2018 रोजी नवमी व दसरा पूजनाचे निमित्त साधून मा. हंसराज अहीर, केंद्रीय गृह राज्यमंत्राी, भारत सरकार यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, नगरसेवक संदीप आवारी, सुनिल डोंगरे, रवि गुरनुले, श्रीकांत भोयर आदी उपस्थित होते. 
यावेळी मा. मंत्राी महोदयांनी सिपेट चंद्रपूर येथे डिप्लोमा या कोर्सेला प्रशिक्षण घेणाÚया प्रथम बॅचच्या विद्याथ्र्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्याथ्र्यांना प्लास्टीक डिप्लोमा कोर्स निवडल्याबद्दल आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी सिपेट चंद्रपूर येथे प्रशिक्षण आणि तांत्रिक सेवांसाठी तयार केलेल्या पायाभूत सुविधांचे कौतुक केले. डिप्लोमाच्या विद्याथ्र्यांनी सिपेट चंद्रपूर येथे आपले मत व्यक्त केले. 
सिपेट चंद्रपूर येथे 2016-17 पासून 1800 प्रशिक्षणार्थी प्रशिक्षित झालेले आहेत व सध्या 180 प्रशिक्षणार्थी विविध अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण घेत आहेत तसेच प्लेसमेंट टक्केवारी 83 टक्के इतकी आहे. उद्घाटन समारंभाच्या दरम्यान श्री. प्रविण बच्छाव, व्यवस्थापक (प्रकल्प), सिपेट चंद्रपूर यांनी मुख्य पाहुणे व इतर प्रतिष्ठीत अतिथी आणि मान्यवर आणि विद्याथ्र्यांचे स्वागत केले. तसेच सिपेट चंद्रपूरच्या कार्यकलापांची माहिती दिली आणि अखेरीस प्रतिष्ठीत अतिथींचे आभार मानले.

गुरुवार, ऑक्टोबर १८, २०१८

लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

लालपेठ येथे बतुकम्मा महोत्सवाचे यशस्वी आयोजन

बेटी बचावो, बेटी बढाओ’ ही आमची प्राथमिकता व जबाबदारी:हंसराज अहीर
चंद्रपूर/प्रतिनिधी:
तेलगू भाषीक बांधवांचा अत्यंत महत्वपूर्ण सण बतुकम्मा महोत्सवाचे आयोजन डाॅ. शामाप्रसाद मुखर्जी तेलुगू हायस्कुल, लालपेठ काॅलरी, चंद्रपूर येथे दि. 16 आॅक्टोंबर 2018ला बतुकम्मा महोत्सव कमीटीच्या वतीने करण्यात आला. 
बतुकम्मा महोत्सवात उपस्थिती तेलुगू भाषिक बंधु-भगीनींना संबोधित करतांना केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी मान. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही केलेली घोषणा केवळ घोषणा नसुन आम्हा सर्वांची प्राथमिकता व जबाबदारी आहे. मुलींच्या सुरक्षेसोबतच सर्वच क्षेत्रात मुलींची प्रगती व्हावी म्हणून आम्ही सतत प्रयत्नरत राहू. 
भारतीय जनता पार्टीने तेलंगना प्रदेशाची प्रभारी म्हणून जबाबदाीर दिल्यावर मला तेथील संस्कृती जवळून पाहण्याचा योग आला व त्यातुनच या बतुकम्मा महोत्सवाचे भव्य आयोजन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन ना. अहीर यांनी केले. चंद्रपूर क्षेत्रात लाखोंच्या संख्येने तेलुगू भाषीक वास्तव्यास असून तेलगू भाषीक भगीनींचा हा सण दरवर्षी साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी याप्रसंगी केली. 
तेलंगणाचे आमदार किशन रेड्डी यांनी आपल्या भाषणात तेलुगू भाषीकांसाठी इतक्या तळमळीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल ना. अहीर यांचे आभार मानत आम्ही हैदराबाद मध्ये देखील इतका भव्य व सुंदर कार्यक्रम बतुकम्मा महोत्सव आयोजित करू शकत नसल्याची कबुली दिली. त्यांनी उपस्थित तेलुगू महिलांना बतुकम्मा महोत्सवासाठी आणखी तयारी करण्याचे आवाहन करीत पुढील वर्षी तेलंगणातुन महिलांचा बतुकम्मा समुह व फिल्म इंडस्ट्रीजची सेलीब्रिटी आण्याचे आश्वासन दिले. 
या कार्यक्रमात आ. नानाजी शामकुळे यांनी देखील तेलुगू भाषीकांना प्रोत्साहन पर भाषण देत बतुकम्मा महोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात. या प्रसंगी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, महापौर अंजलीताई घोटेकर, जिल्हाधिकारी डाॅ. कुणाल खेमणार, पोलीस अधीक्षक माहेश्वर रेड्डी इत्यादी मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. 
या कार्यक्रमास उपमहापौर अनिल फुलझेले, श्रीधर रेड्डी, दिनकर पावडे, मोहन चैधरी, नगरसेविका कल्पना बागुलकर, ज्योती गेडाम, माया उईके, शिला चव्हाण, निलम आक्केवार, नगरसेवक संदीप आवारी, उपक्षेत्रिय प्रबंधक हलदर, गणेश गेडाम, जितेंद्र धोटे, सतिश तिवारी, दिनकर पावडे, बतुकम्मा कमेटीचे अध्यक्ष तथा मनपा झोन सभापती श्याम कनकम, सदस्य संजय मिसलवार, राजेश तिवारी, श्रीनिवास रंगेरी, राजू कामपेल्ली, रामलु भंडारी, राजेश कोमल्ला, रामस्वामी पुरेड्डी, श्रीनिवास येरकल, श्रीनिवास झुनझुल, कुमार इदनुरी, रमेश मोकनपेल्ली, क्रिष्णा कारंगल, राजेश मिष्ठा, तिरूपती बुडदी, भुमन्ना दोम्मटी, गट्टया जुपाका, सारया पोटला, सुनिल मिसलवार, सीनु मेकला, महादेव अरेनार, तेजा सिंग, सुरेश गोलीवार, नरेश पुजारी, भानेष चिलमील, कृणाल गुंडावार, पराग मलोडे, संदीप आगलावे, आकाश लख्खाकुला, शैलेश दिंडेवार व लालपेठ परिसरातील बहुसंख्य तेलुगूभाषीक नागरिकांची उपस्थिती होती.

प्रत्येक घरात सैनिक जन्मावा

प्रत्येक घरात सैनिक जन्मावा

सन्मित्र सैनिकी विद्यालयातील शस्त्रापुजन समारंभात 
केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांचे प्रतिपादन 
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 जिजामातेमुळे शिवाजी घडले, असे प्रत्येक घरात सैनिक घडावा स्वातंत्रावीर सावरकर म्हणत असत की, प्रत्येक नागरिकाने सैनिकी शिक्षण घ्यावे. ‘सैन्यात सामिल व्हा’ हे सावरकरांचे आवाहन आजही तितकेच लागू आहे. शालेय शिक्षणाबरोबरच देश रक्षा करण्याच्या आपल्या कर्तव्याचेही शिक्षण मुलांना दिले पाहिजे. शस्त्रापुजनाची भारताची प्राचीन परंपरा आहे, जी आजतागायत सुरू आहे. देशरक्षा करतांना आम्ही तर एकप्रकारे रोजच शस्त्रापुजन करतो. रणावीण तर स्वातंत्रयही मिळाले नाही. पोलीस व पोलीसखात्याशी संबंधित व्यवस्थाही आपल्याला माहित हव्या, या शब्दात सन्मित्रा सैनिकी विद्यालयातील शस्त्रापुजनाच्या कार्यक्रमात केन्द्रीय गृहराज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांनी आपले विचार व्यक्त केले. 
सन्मित्रा सैनिकी विद्यालयात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शस्त्रापुजन समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यालयात यावेळी भारतमाता नवरात्रोत्सव सुरू असून दीपप्रज्वलनानंतर केन्द्रीय गृह राज्यमंत्राी ना. हंसराज अहीर यांच्यासह मंचावर उपस्थित तरूण भारतचे पत्राकार संजय रामगीरवार, सन्मित्रा मंडळाचे उपाध्यक्ष डाॅ. विजय धनकर, सचिव अॅड. निलेश चोरे, कमांडंट सुरींदरकुमार राणा व प्राचार्य मनोज अलोणी यांनी भारतमातेची आरती केली. शस्त्रापुजनानंतर अॅड. निलेश चोरे यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी ना. अहीर यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व ग्रंथगुच्छ देवून सत्कार केला. याप्रसंगी संजय रामगीरवार यांनी भारतमाता नवरात्रोत्सवाविषयी आपले विचार व्यक्त केले. 
निखील महाकाली याने ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्दे मारतम्’ हे वैयक्तिक गीत सादर केले. भारतमाता नवरात्रोत्सवात घेतल्या गेलेल्या वादविवाद स्पर्धेत विजयी झालेले सूचित भोगेकर, दिनेश शेवाळे, अजित पिंपळशेंडे, यश मोडक, तुषार खारकर यांना व भारताचे बोलके चित्रा रांगोळीतून सादर करणाÚया आदित्य पारधी, विवेक बोंडे, रजत कायरकर, पीयूष भाजे, अक्षय मोहितकर, वैभव गिरटकर, छविलशाह आत्राम, सुचित भोगेकर, नैतिक पाल, सौरभ धांडे, प्रशिल धांडे, निखील चैके, रितीक गिरसावळे, निखील महाकाली या सर्व कलाकारांचा गौरव करण्यात आला. 
सर्वांनी घेतलेल्या देशरक्षेच्या प्रतिज्ञेनंतर मंगेश देऊरकर यांनी गायलेल्या वन्दे मातरम्ने कार्यक्रमाची सांगता झाली.

शनिवार, सप्टेंबर २९, २०१८

 अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

अपघात प्रवण क्षेत्रावरील अपघाताचे प्रमाण कमी करा:हंसराज अहीर

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर जिल्हयातील वाहनांची संख्या मोठया प्रमाणात वाढत आहे. हे एक ऐतिहासिक शहर असून या ठिकाणी रस्त्यांच्या काही भागात मर्यादा पडतात. त्यामुळे शहरातील वाहन व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी अपघात प्रवण क्षेत्राची (ब्लॅक स्पॉट) निवड करण्यात यावी व त्या ठिकाणी अपघात होणार नाही, अशा पध्दतीच्या उपाय योजना करण्यात याव्यात यावी, अशी सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री ना.हंसराज अहीर यांनी केली.
केंद्र सरकारच्या अधिसुचनेनुसार जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्षपद जिल्हयाचे लोकसभा सदस्य म्हणून ना. हंसराज अहीर यांच्याकडे आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक आज 28 सप्टेंबर रोजी पोलीस मुख्यालय, चंद्रपूर येथे पार पडली. 
जिल्हा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेचे कामकाज पार पाडतांना अधिका-यांना अपघात प्रवण क्षेत्रा (ब्लॅक स्पॉट) निवडलेल्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना दोन महिन्यांत करून अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी निर्देश दिले. 
यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, मनपाचे आयुक्त संजय काकडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विश्वंबर शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंडळाच्या अधीक्षक अभियंत्या सुषमा साखरवडे, कार्यकारी अभियंता मनोज जयस्वाल व एस.आर.जाधव, राष्ट्रीय महामार्गाचे सहाय्यक अभियंता व अन्य अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. 
समोर आलेल्या माहितीनुसार सन 2015 ते 2017 या वर्षात चंद्रपूर जिल्हयात अपघात व मृत्यू यांचे प्रमाण सतत वाढत आहे. भारतात वर्षाला दीड लक्ष लोकांचा अपघाती मृत्यू होत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी करण्याची गरज भासली असून यावर उपाययोजना म्हणून जिल्हयात एकुण 28 ठिकाणी अपघात पवण क्षेत्रा म्हणून अभ्यासपूर्ण निवड परिवहन विभागाने केली असून त्यावर उपाययोजना सुचविलेल्या आहेत. बैठकीत काही उपाययोजना दोन महिन्यांच्या कालावधीत तर काही दोन महिन्यांच्या कालावधीत होण्यासारख्या असल्याने दोन महिन्यात काम पूर्ण करण्याचे ना. अहीर यांनी निर्देश दिले. महानगराच्या महापौर अंजली घोटेकर यांनी वाहतूक नियमनासाठी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांची विनामुल्य मदत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. त्यावर ना.अहीर यांनी दुजोरा देवून असा प्रयोग करता येईल अशा सुचना केल्या. 
जिल्हयात अवैध बस वाहतूक, वेकोलि व सिमेंटच्या ओवरलोड ट्रक व त्यांच्यामुळे होणारे प्रदुषण याकडे सभेचे लक्ष वेधून त्यावर चर्चा केली व अशा वाहतुकीवर कडक कार्यवाही करावी असे निर्देश दिले. चंद्रपूर जिल्हयात 5 लक्ष 74 हजार वाहने असून त्यात दुचाक्या 4 लक्ष 70 हजार इतक्या आहेत. इतक्या मोठया प्रमाणात वाहणे असल्याने परिवहन नियमन करणे जिकरीचे होत आहे. जिल्हयातून 107 कोटी इतका मोठा महसुल परिवहन विभागाकडून राज्य सरकारला जात असल्याने परिवहन विभागाचे सक्षमिकरण दर्जोन्नती करण्यावर यापुढे भर देण्यात येईल असे श्री. अहीर यांनी सांगितले. 
साधारणपणे ही बैठक तीन महिन्यातुन एकदा घ्यावयाची असली तरी ब्लॅकस्पाॅटवर करावयाच्या उपाययोजना व अपघाताचे प्रमाण कमी तातडीने उद्दीष्टय डोळयासमोर असल्याने पुढील बैठक दोन महिन्यांच्या आत घेण्यात येईल असे विभागास सांगून तोपर्यंत सर्व विभागाने दोन महिन्यांच्या आत सोपविलेली कामे पूर्ण करावीत असे सक्त निर्देश दिले.
  सर्जिकल स्ट्राईकच्या समर्थनार्थ शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन

सर्जिकल स्ट्राईकच्या समर्थनार्थ शौर्यदिन कार्यक्रमाचे आयोजन

serjical strike साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
  29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय सैन्य दलाने पाकिस्तान हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईक करून अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय जवानांची ही अभिमानास्पद कामगीरी जनतेपर्यंत पोहचविण्याकरिता 29 सप्टेंबर हा शौर्य दिवस पूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. या शुरवीर सैनिकांच्या सन्मानार्थ चंद्रपुरातही शौर्य दिवस दि. 29 सप्टेंबर 2018 रोजी आयएमए हाॅल, गंजवार्ड येथे सायं. 5.00 वाजता साजरा होणार आहे. या कार्यक्रमास भारताचे केंद्रीय गृह राज्यमंत्राी मा.ना.श्री. हंसराजजी अहीर, महाराष्ट्र राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्राी मा.ना.श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार श्री. नानाभाऊ शामकुळे, महापौर अंजलीताई घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, जिल्हाधिकारी श्री. कुणाल खेमणार, जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. महेश्वर रेड्डी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पापडकर, आयुक्त श्री. संजय काकडे आदी मान्यवर सदर कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. 
या कार्यक्रमाला सर्व मनपा सदस्य, जि.प. सदस्य, पं.स. सदस्य, न.प. सदस्य तसेच सर्व चंद्रपूर शहरातील नागरिकांनी शौर्यदिन कार्यक्रमास उपस्थित राहून शुरवीर भारतीय जवानांच्या कार्याचा सन्मान करण्यास उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजकानी प्रसिध्दीस दिलेल्या पत्राकातून केले आहे.