Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर १३, २०१८

‘ग्रिन गणेशा’ अभियान अंतर्गत पर्यावरणपुरक मुर्तीची स्थापना

इको-प्रो तर्फे मातीची व विना रंगाची मुर्ती बाबत जनजागृती  


चंद्रपूर/प्रतिनिधी:
 इको-प्रो ग्रीन गणेशा अभियान अंतर्गत मातीची व विना रंगाची मुर्तीची स्थापना करून पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे आज इको-प्रो कार्यालयातून मातीची आणि विना रंगाची मूर्ति गणेशभक्तानी घरी नेऊन स्थापना केली. 
दरवर्षी इको-प्रो संस्थेच्या पर्यावरण संरक्षण विभाग अंतर्गत ‘ग्रिन गणेशा’ हे अभियान पर्यावरणपुरक गणेशोत्सव कसा साजरा करावा याकरीता राबविण्यात येते. प्लास्टर आॅफ पॅरीस च्या मुर्ती पेक्षा मातीची मुर्ती तर रासायनीक रंगामुळे होणारे प्रदुषण टाळण्यास विना रंगाची मुर्ती योग्य पर्याय असल्याने मागील काही वर्षापासुन संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे, इको-प्रो कार्यालय व इतर सदस्य आपल्या घरी मातीची व विना रंगाची मुर्तीची स्थापना करतात, तसेच मुर्तीचे विसर्जन घरीच करतात तसेच घरी जमा झालेले निर्माल्यापासुन घरीच एका कुंडीत खत निर्मीती करीत असतात. शहरात बरेच नागरीक पारंपारीक पध्दतीने मातीच्या मुुर्तीस घरीच शेंदुर फासुन घरी स्थापना करीत असतात. आपली गणेशोत्सवाबाबत प्रथा पंरपरा निसर्गास हितावह असतांना सुध्दा सुंदर आणी सुबकता याचे आहारी जाऊन गणेशोत्सवास सुध्दा प्रदुषण वाढविण्यास कारणीभुत ठरवित आहोत, हे टाळण्याच्या दृष्टीने मागील वर्षी पासून इको-प्रो संस्थेच्या कार्यालयात मातीची व विना रंगाची मुर्ती वितरण करण्याकरीता आणुन ठेवण्यात आलेल्या होत्या. संस्थचे सदस्य व नागरीकांनी पर्यावरणपुरक गणेशोत्सव साजरा करण्यास मातीची व विना रंगाची मुर्ती स्थापना करण्याचा संकल्प केला.
यंदाच्या गणेशोत्सवा करीता आज इको-प्रो कार्यालयातुन अशा पर्यावरणपुरक गणेशाच्या मुर्ती गणेश भक्तानी नेण्यात आले त्यात श्री रमेश मुलकलवार, निवृत्त विस्तार अधिकारी (शिक्षक), श्री हरीश ससनकर, शिक्षक, परीक्षीत सराफ, सुजीत घाटे, सुमीत कोहळे, नीलेश मड़ावी आदीचा समावेश होता तर काहीनी मुर्तीकारांकडे विना रंगाची मुर्तीची मागणी केलेली होती. या अभियानात सहभागी होत अनेकांनी पर्यावरणपुरक गणेशाची स्थापना केलेली आहे. पुढील वर्षी सदर ग्रिन गणेशा अभियान अंतर्गत कुंभार बांधवाच्या मातीच्या व विना रंगाच्या मुर्ती नागरीक कशा पध्दतीने जास्तीत जास्त प्रमाणात घेतील यावर भर दिला जाणार आहे. जेणेकरून गणेशोत्सवा दरम्यान होणार प्रदुषण टाळता येतील. घरीच्या घरी गणेशा विसर्जन व निर्माल्याचे खत तयार करण्यास नागरीकांचा प्रतीसाद वाढत असल्याने दरवर्षी एक कंुडीत एक झाड आणी तयार झालेले खत यातुन दरवर्षीच्या गणेशाचे स्मृती जपण्याची कल्पना नागरीकांना आवडली आहे. संस्थेतर्फे याचा प्रचार आणी प्रसार पुढील वर्षीपासुन मोठया प्रमाणात केला जाणार आहे.
सदर ग्रिन गणेशा अभियान राबविण्याकरीता पर्यावरणमीत्र तथा संस्थेचे अध्यक्ष बंडु धोतरे यांचे मार्गदर्शनात इको-प्रो संस्थेच्या ‘पर्यावरण विभागचे प्रमुख’ नितीन रामटेके, उपप्रमुख प्रज्ञा सराफ, अमोल उत्तलवार, वैभव मडावी, सुमीत कोहळे, हरीश मेश्राम यांचे सह इको-प्रो चे सदस्य सहकार्य करीत आहेत.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.