‘श्री गणेश पूजा आणि आरती’ (Ganesh Puja and Aarti) या ‘अँड्रॉईड अॅप’चे लोकार्पण नुकतेच सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. हे अॅप मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांमध्ये उपलब्ध आहे. या अॅपमध्ये ‘श्री गणेश पूजाविधी कसा करावा ?’, ‘आरतीसंग्रह आणि नामजप (ऑडिओसहित)’, ‘श्री गणपति अथर्वशीर्ष (ऑडिओसहित)’, तसेच ‘गणपतीची उपासना आणि त्या संदर्भातील धार्मिक कृती करण्याच्या शास्त्रीय पद्धत, त्यामागील कारणे आणि त्यांचे लाभ’ यांविषयीची माहिती दिली आहे. ‘प्रत्येक व्यक्ती ईश्वरप्राप्तीसाठी करत असलेले प्रयत्न अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोनातून व्हावेत आणि त्यांची फलप्राप्ती व्हावी’, हा दृष्टीकोन ‘गणेश पूजा आणि आरती’ या अॅपद्वारे देण्याचा प्रयत्न केला आहे. स्वतः योग्य पद्धतीने धर्माचरण करण्यासाठी आणि समाजातही धर्मप्रसार व्हावा, यासाठी गणेशभक्तांनी हे अॅप डाऊनलोड करावे आणि आपले मित्र, तसेच आप्तेष्टांनाही ‘शेअर’ करावे, असे आवाहन सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे. (याची लिंक पुढे दिली आहे.)
यांसह ‘श्री गणपति’ (४ भाग), ‘आरतीसंग्रह’, ‘श्री गणेश पूजाविधी’, ‘श्री गणेश अथर्वशीर्ष व संकटनाशनस्तोत्र (अर्थासह)’, ‘श्री गणेशमूर्ती शास्त्रानुसार कशी असावी ?’ आदी ग्रंथ आणि लघुग्रंथ, तसेच श्री गणेशाचे सात्त्विक चित्र आणि सात्त्विक नामपट्ट्या उपलब्ध सनातन संस्थेने निर्मिल्या आहेत. या सर्व उत्पादनांसाठी नजिकच्या सनातनच्या विक्री केंद्राला किंवा SanatanShop.com या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहनही सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘श्री गणेश पूजा आणि आरती’ या अॅपसाठी पुढील लिंकवर क्लिक करा :
https://www.sanatan.org/ganeshapp