नागपूर : नागपूर मेट्रोच्या निर्माण कार्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला आहे. बेशिस्तीने कामे सुरु असून, नागरीकांच्या घरांना तडे गेले आहेत. सीए मार्ग, गांधीबाग आदी ठिकाणी खड्डे खोदले आहेत. त्यात पावसाचे पाणी साचल्याने घाण निर्माण झाली आहे.
नागपूर मेट्रोचे बेशिस्तीने कामे सुरु आहेत. यामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना अडचणींना समोरे जावे लागत आहे. अलिकडेच अंबाझरी टी पॉईंट येथे तीन विद्यार्थीनींचा मेट्रोच्या क्रेन चालकाने जीव घेतला. सीए मार्ग, गांधीबाग येथे मेट्रो स्टेशन निर्माण होणार आहे. त्यासाठी खड्डे खोदलेले आहे. खड्डे खोदताना आजुबाजूंच्या घरांना तडे गेले आहेत. याबाबत तेथील नागरीक राजू देसाई व इतर व्यापाऱ्यांनी मेट्रोच्या अभियंत्याशी चर्चा केली. त्यांना समस्या सांगितली. तरीही त्यांनी याबाबत मौन साधले. मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांच्याशी संपर्क साधूनही त्यांनी मी याबाबत कोणतीही मदत करु शकत नसल्याचे सांगितले. पत्रकार परिषदेला मेट्रो इलेक्ट्रिकल्स, एशियन ट्रेडींग, बॉम्बे मर्चंट्स, बन्सोड टी कंपनी, आदित्य पटेल, डागा आदी उपस्थित होते.