Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, सप्टेंबर २०, २०१८

सेक्ससाठी कश्मीरी तरुणीही नागपुरात


बेलतरोडी, मनीषनगर, अजनी, हुडकेश्‍वर, सीताबर्डी, धंतोली, शंकरनगर व अंबाझरी हे परिसर देहव्यापाराचे "हब' बनले आहेत. काश्‍मीरसह अन्य राज्यांतील जवळपास 800 पेक्षा जास्त तरुणी "मसाज' सेवा देण्यासाठी सज्ज असल्याची माहिती देहव्यापाराशी संबंधित सूत्रांनी दिली.
वर्षभरापासून शहरातील देहव्यापार चांगलाच फोफावला आहे. उपराजधानीला "सेक्‍स रॅकेट' हब अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. 



एम्प्रेस मालमध्येही सेक्स रॅकेट 

शहर पोलीसांनी २४ तासात एम्प्रेस मॉलसह दोन ठिकाणी सुरु असलेले देह व्यापाराचे अड्डे उघडकीस आणले.
पहिली कारवाई गांधीसागर तलाव येथील एम्प्रेस मॉलमध्ये करण्यात आली. सामाजिक सुरक्षा शाखेला मॉलमधील पहल्या माळ्यावर असलल्या ‘सलुन अ‍ॅण्ड स्पा’मध्ये देह व्यापार चालत असल्याची माहिती मिळाली. स्पाची मालक दर्शना उर्फ खुशी अनिल धकान (३५) रा. काचीमेट वाडी आहे. पोलिसांनी धाड टाकण्याची योजना आखली. 
शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता डमी ग्राहक स्पामध्ये पाठवण्यात आला. खुशीने दीड हजार रुपयात एका तरुणीचा सौदा केला. ग्राहकाने इशारा करताच पोलिसांनी धाड टाकून खुशीला पकडले. स्पा मध्ये तीन तरुणी सापडल्या. एक तरुणी दिल्लीची राहणारी आहे. पोलिसांनी स्पा मधून मोबाईल, रुपये आणि रजीस्ट्रर जप्त केले. अड्ड्यावर सापडलेल्या तरुणीचा विचारपूस केल्यावर पोलिसांनी खुशीला ताब्यात घेतले. खुशीला आॅक्टोबर २०१७ मध्ये सुद्धा वाडीमध्ये देह व्यापाराचा अड्डा चालवतांना पकडले होते. सुटल्यानंतर तिने अड्डा बंद केला होता. यानंतर एम्प्रेस मॉलमध्ये स्पा च्या नावावर देह व्यापार करू लागली. तिने ५० हजार रुपये महिना भाड्याने स्पा घेतला होता.
सूत्रानुसार एम्प्रेस मॉलमध्ये अनेक दिवसांपासून देह व्यापार सुरु आहे. तीन महिन्यांपूर्वी बेलतरोडी पोलिसांनी केलेल्या कारवाईतही एम्प्रेस मॉलमध्ये देह व्यापार सुरु असल्याची बाब उघडकीस आली होती. सातत्याने चर्चा होवूनही पोलीस एम्प्रेस मॉलवर कारवाई करण्यास मागे पुढे पाहत होते.





दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा 

दुसरी कारवाई झोन पाचच्या विशेष चमूने कळमना येथे सुरु असलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर केली. येथे एक महिला आणि आॅटोचालकास पकडले. पोलिसांना डिप्टी सिग्नल येथील कविता बांदे ही महिला देह व्यापार चालवित असल्याची माहिती मिळाली होती. या आधारावर पोलिसांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून कविताशी संपर्क साधला. त्याने दोन हजार रुपयात तरुणीचा सौदा केला. कविताने ग्राहकास आरोपी स्वीटी बागडे हिच्या घरी जाण्यास सांगितले. कविताने आॅटो चालक शेख कलीम शेख मुनीर (३२) रा. शेखनगर खरबी याच्यासोबत तरुणीला स्वीटीच्या घरी पाठवले.डमी ग्राहकाने इशारा करताच पोलीसांनी धाड टाकून स्वीटी आणि कलीमला पकडले. त्यांच्याकडे तरुणीही सापडली.

छायाचित्र -  साभार- विजय तायडे 



 हाॅटेल केपी इंनमध्ये सेक्स रॅकेट
नागपूर- धंतोली भागात असलेल्या हाॅटेल केपी इंनमध्ये सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. छापा घालून अनेकांवर कारवाई केली आहे. यात रशियन तरुणींनी सापङल्या असून, त्यांच्याकङून मोबाईल आणि ङायरी जप्त करण्यात आली.

मागील आठ दिवसांमध्ये ही तिसरी कारवाई असून, नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीणमध्ये सेक्स रॅकेट चे प्रमाण मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे उघड झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच रामदासपेठ येथील एका स्पा सलून आणि हॉटेलमध्ये देहव्यापार सुरू असल्याचा भांडाफोड झाला होता. त्यानंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी गोंडखैरी येथील एका फार्म हाऊसवर छापा घालून सेक्स डान्स करणाऱ्या तरुण तरुणींना अटक केली होती. शहरात ब्युटी पार्लर, मसाज सेंटर, हॉटेल, फार्म हाऊस आदी ठिकाणी सेक्स रॅकेट चे प्रमाण मोठ्या संख्येने वाढलेले आहे. शहरात नुकतेच नव्याने रुजू झालेले पोलीस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय आणि त्यांच्या नवी टीमने याविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. नागपूर ग्रामीणमध्ये नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनीही अशा सेक्स रॅकेट विरुद्ध कारवाईचे धडक मोहीम सुरू केली आहे.


नागपूरच्या रामदासपेठेतील पॉश कुंटनखान्यावर छापा


रामदासपेठेतील एका पॉश इमारतीत परिमंडळ दोनचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या पथकाने छापा मारून स्पा च्या आड चालणारा कुंटणखाना उजेडात आणला. या प्रकरणी स्पा मालकासह पाच जणांना अटक करण्यात आली असून, एक जण फरार आहे.


धरमपेठमध्ये भाड्याच्या सदनिकेत
गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकानेआॅनलाईन हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून एका महिलेसह तिघांना अटक केली. सौरभ राजेंद्र मून (वय २४), श्वेता सौरभ जैन (वय २२, रा. दोघेही, वाराशिवनी, बालाघाट) आणि केविन जॉन चक्कू ( वय २९, रा. पुट्टेपारमपील, केरळ), अशी आरोपींची नावे आहेत. हे तिघेही गेल्या काही महिन्यांपासून खरे टाऊन धरमपेठमध्ये भाड्याच्या सदनिकेत राहतात. अत्यंत टेक्नोसॅव्ही असलेले हे तिघे सोशल साईटवरून सेक्स रॅकेट चालवीत होते. त्यांनी संकेतस्थळावर एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली राहुल आणि अर्जुन नाव टाकून आपला मोबाईल क्रमांक नमूद केला होता. या क्रमांकावर येणाऱ्या नंबरवर श्वेता लाघवी आवाजात ग्राहकांना पाहिजे तशी महिला आणि मुलगी उपलब्ध करून देण्याची बतावणी करायची. ग्राहकाच्या ऐपतीनुसार, त्याला महिला-मुलीचे दर सांगत होती. ग्राहकाने रक्कम जमा करताच धरमपेठसारख्या पॉश एरियातील खरे टाऊनमध्ये हे त्रिकूट त्याला सदाशिव अपार्टमेंटमधील सदनिका उपलब्ध करून देत होते. ही माहिती गुन्हे शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांना कळाली. त्यांनी आपल्या सहकाºयांकडून शहानिशा करवून घेतली. त्यानंतर गुरुवारी दुपारी एका बनावट ग्राहकाने सौरभ, श्वेता तसेच केविनसोबत संपर्क साधला. विशिष्ट रक्कम स्वीकारल्यानंतर या त्रिकुटाने ग्राहकाला एक देहविक्रय करणारी तरुणी उपलब्ध करून दिली. त्याचवेळी उपायुक्त श्वेता खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीना जगताप, सहायक निरीक्षक संजीवनी थोरात, फौजदार अजय जाधव, हवालदार विजय गायकवाड, दामोदर राजूरकर, नायक संजय पांडे, अस्मिता मेश्राम, छाया राऊत, बळीराम रेवतकर, सामाजिक कार्यकर्त्या नूतन रेवतकर आणि शकुन सनेश्वर यांनी या कुंटणखान्यावर छापा घातला. यावेळी हे त्रिकूट तसेच वेश्याव्यसाय करणारी तरुणी पोलिसांच्या हाती लागली. पोलिसांनी बयान नोंदविल्यानंतर तिला सोडून दिले तर सौरभ, श्वेता आणि केविनला कलम ३७०, ३४ तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार सीताबर्डी ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.