Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट १४, २०१८

निवासी भागातील गॅस गोडावून शहराबाहेर हलवा:मनसेचे जिल्हाधिकारी यांना निवेदन

चंद्रपुर/प्रतिनिधी:
 शहराच्या मध्यभागी मागील कित्येक वर्षांपासून गॅस गोडावून हे मोठ्या दुर्घटनेला निमंत्रण देताना दिसत आहे, ज्यावेळेस हे गॅस गोडावून सुरु झाले असतील त्यावेळेस त्याठिकाणी हा निवासी भाग नसेल पण आता शहर चारही बाजूने विस्तारलेले आहे व हे गॅस गोडावून आता शहराच्या मध्यभागी आहे हे बघता याभागात केव्हाही मोठी दुर्घटना होऊ शकते व लवकरात लवकर दुर्घटनेला निमंत्रण देणारे गॅस गोडावून शहराबाहेर हलविण्यात यावे या मागणीच निवेदन जिल्हाधिकारी खेमणार याना देण्यात आले. 
रामनगर, गंजवार्ड , आणि टिळक मैदानात असलेलं गॅस गोडावून हे गेल्या कित्येक वर्षांपासून एकाच ठिकाणी आहे कधी तर मध्येच गाड्या थांबवून नागरिकांना सिलेंडरचे वितरण नियम धाब्यावर ठेवून करीत असतात. 
टिळक मैदानात असलेल्या गोडावून च्या बाजूला मिठाई चे दुकान आहे त्याठिकाणी रोज स्टोव्हच्या माध्यमातून नवनवीन पकवान काढण्याचं काम सुरु असते हे सर्व सुरु असताना एक ठिणगीच मोठ्या दुर्घटने साठी पुरेशी आहे हि बाब प्रशासनाने लक्षात घ्यायला हवी, प्रशासनाने वेळोवेळी जाऊन नियमांच पालन होत आहे का तपासायला हवे पण तस काही होत नाही, कारण शहरात नियम धाब्यावर बसवूनच सर्व कामे सुरु आहेत हि बाब जिल्हाधिकारी खेमणार यांना लक्षात आणून दिली त्यांनी सर्व बाबी समजून  त्वरित याच्यावर तोडगा काढून गॅस गोडावून शहराबाहेर हलविण्यासंदर्भात प्रक्रिया करू असे आश्वासन दिले. 
जिल्हाधिकारी खेमणार यांना या मागणीचे निवेदन देण्याकरिता शिष्टमंडळात मनसे महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, मनविसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, भरत गुप्ता , मनोज तांबेकर आदी कार्यकर्त्याची उपस्थिती होती.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.