Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, ऑगस्ट १३, २०१८

महानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा लवकरच

नागपूर/प्रतिनिधी:

महानिर्मिती जाहिरात क्र.११(सप्टे)/२०१७ अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या “निम्नस्तर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखा) या पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने सदर पदांची ऑनलाईन परीक्षा ११ व १२ नोव्हेंबर २०१७ रोजी घेण्यात आली होती.
सदर ऑनलाईन परीक्षेदरम्यान औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रातील पेपरफुटीच्या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे. (गुन्ह्याबाबतचा नेमका तपशील महानिर्मिती संकेतस्थळावरील अधिसूचनेत देण्यात आलेला आहे). 
सदरील पदांच्या परीक्षेत पारदर्शकता असावी याकरिता, हि  ऑनलाईन परीक्षा प्रशासकीय कारणास्तव रद्दबातल करण्यात येत असून, ह्याबाबतचा एस.एम.एस. / ई-मेल संबंधित उमेदवारांना पाठविण्यात येत आहे.  लवकरच  ह्या पदांची ऑनलाईन परीक्षा पुनश्च घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी २०१७ मध्ये अर्ज केला होता ते सर्व उमेदवार  नव्याने होणाऱ्या परीक्षेस पात्र राहतील.   सविस्तर तपशील, महानिर्मितीच्या  www.mahagenco.in   या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.