Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

‘बस द्या बस’;बससाठी विद्यार्थ्यांचा एल्गार

Student's Elgar for the bus | बससाठी विद्यार्थ्यांचा एल्गारमूल/प्रतिनिधी:
 येथे शिक्षणासाठी येणाऱ्या शेकडो चिमुकल्या विद्यार्थ्यांनी बुधवारी ‘बस द्या बस’ अशा घोषणा देत बसस्थानक परिसरात आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व श्रमिक एल्गारच्या अध्यक्ष अ‍ॅड. पारोमिता गोस्वामी यांनी केले.
मूल येथे ग्रामिण भागातून शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र परिवहन महामंडळाच्या भोंगळ कारभारामुळे बसगाड्या अनियमित सुटत आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना बसस्थानक परिसरात ताटकळत उभे रहावे लागते. यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, पोंभुर्णा, गोंडपिपरी या मार्गावरचे विद्यार्थी सकाळी ७.३० वाजतापर्यंत मूलला पोहचतील, तर दुपारी १२ वाजता व सायंकाळी ५ वाजता व बुधवारी ३ वाजता मूलवरून नियमित बसगाड्या सोडाव्या. शैक्षणिक सत्र संपण्यापूर्वीच पास संपल्याचे सबब देत विद्यार्थ्यांची पास बंद करण्यात येत असल्याने पासची मुद्दत वाढवावी, अशी मागणी करण्यात आली.
परिवहन मंडळाच्या अधिकाºयांनी सर्व मार्गावर बसगाड्या सुरू करण्यात येतील, असे आश्वासन दिले. मागण्यांचे निवेदन चंद्रपूरचे आगार व्यवस्थापक एस. व्ही. डफळे, वाहतूक अधीक्षक ए. बी. बोबडे, वाहतूक निरीक्षक एच. बी. गोवर्धन, वाहतूक निरीक्षक एस. सी. मेघावत, मूलचे वाहतूक नियंत्रक एन. डी. पठाण यांनी स्वीकारले. यावेळी श्रमिक एल्गारचे उपाध्यक्ष विजय सिद्धावार, अमित राऊत, गौरव श्यामकुळे, अमर कड्याम, रवि शेरकी, शहनाज बेग, विशान नर्मलवार, संगिता गेडाम उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.