Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, ऑगस्ट २२, २०१८

मल्हार फिल्म आर्ट/ मल्हार स्टुडिओने साजरा केला जागतिक छायाचित्र दिन

आर्वी/प्रतिनिधी: 
 जागतिक छायाचित्र दिन निमित्य मल्हार फिल्म आर्ट मल्हार फोटोग्राफीच्या वतीनं आर्वीच्या इतिहासात पहिल्यांदाच एक पाऊल पुढे नवीन उपक्रमाला सुरवात केलीय.या जागतिक फोटोग्राफी दिवासाचे औचित्य साधून ज्यांनी आपल्या आयुष्यातील अनमोल वेळ फोटोग्राफी क्षेत्राला देऊन भरगोस योगदान दिले त्या जेष्ठ छायाचित्रकार प्रशांत सव्वालाखे व श्रीमती वर्षा संजय शिरभाते यांचा शाल,श्रीफळ,व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष म्हणून आर्वीचे ठानेदार संपत चव्हाण तर प्रमुख अतिथी म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.नंदकिशोर कोल्हे, जेष्ठ पत्रकार दशरथ जाधव, मागासवर्गीय बहुद्देशी शिक्षण संस्था आर्वी चे उपाध्यक्ष सुरेश अहिव, समाज भूषण राजेश अहिव, संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल क्षीरसागर यांच्या उपस्थितीत पार पडला.
नेहमीच नाव नवीन उपक्रम राबवून समाजाला काहीं देणं लागतं याची जाणीव ठेवत वेगळी ओळख निर्माण करण्याचा काम सातत्यानं सुरू आहे. यातच या जागतिक छायाचित्र दिना निमित्य इतिहासातील पहिल्या कार्यक्रमाच आयोजन करून खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न आर्वीत मल्हार फिल्म आर्ट/फोटोग्राफी चे "संचालक अमित अहिव" व "सहसंचालक अमोल अहिव" यांनी करुण आर्वी छायाचित्रकार यांना छायेचे किरण दाखवून आदर व्यक्त केला, कार्यक्रमाला आर्वीतील सर्व युवा छायाचित्रकार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.कार्यक्रमाच सूत्र संचालन/आभार प्रदर्शन शिवाजी सावंत यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अक्षय अहिव यांचे विशेष सहकार्य लाभले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.