Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २४, २०१८

फेसबुकच्या एका पोस्टमुळे चंद्रपुरात बनला रस्ता


ललित लांजेवार:

स्वच्छ चंद्रपूर सुंदर चंद्रपूर म्हणून स्वच्छ शहराच्या यादीत रेटलेल्या चंद्रपुर शहरातील चिखलाने माखलेल्या आणि खड्यांनी घेरलेल्या "नगीनाबाग" परिसरातील परिस्थिती निव्वळ एका फेसबुकच्या माध्यमातून अपलोड करणात आलेल्या पोस्टमुळे बदलली आहे. 
शहरातील प्रभाग क्रमांक ९ "नगीनाबाग" परिसरातील "आनंदनगर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसराची गेल्या काही वर्षांपासून दुरवस्था झाली होती, या प्रभागातील नागरिकांना पावसाळा सुरु झाला अन तोंडावर पडण्याची वेळ आली होती. कारण प्रभागातील रस्ते व्यवस्थित नसल्याने परिसरातील नागरिकांना खड्यांतून व चिखलातून वाट काढत आपल्या मार्गी लागावे लागत होते. मात्र परिसरातील पत्रकार तसेच सामजिक कार्यात नेहमी तत्पर राहणारे सुनील तिवारी यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे परिसरातील मार्गाचा "चेहरा मोहराच" पार बदलून गेला.
सुनील तिवारी यांनी १६ जुलै २०१८ रोजी संध्याकाळी आपल्या फेसबुक अकाउंट वरून एक पोस्ट टाकली ज्यात ५० लाख रुपये खर्च करून शहरातील प्रभाग क्रमांक ९ अंतर्गत येणाऱ्या शहरातील "नगीनाबाग" येथील "आनंदनगर" परिसरात महानगर पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पंडित दिनदयाल उपाध्याय उद्याना समोरील रस्त्याची वास्तविकता दर्शविणारी दिन अवस्थेतील काही छायाचित्रे शीर्षकासोबत पोस्ट केली होती. परिसराचे नाव "आनंदनगर" मात्र परिसरातील स्थिती खड्यांमुळे व चिखलामुळे दुख झेलत आहेत,विशेष म्हणजे या प्रभागाचे नगरसेवक राहुल पावडे चंद्रपूर महानगर पालिकेचे स्थायी समिती सभापती सुद्धा आहेत. तसेच "विकासपुरुष" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्याचे अर्थ नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अगदी जवळचे विश्वासू आहेत इतके सर्व असून सुद्धा नगरसेवकाच्या प्रभागाचीच "चिखला" अवस्था नगरसेवकांना दिसून येत नाही का? हा या पोस्ट मागचा मुख्य हेतू होता, या आशयाची पोस्ट फेसबुकवर अपलोड होताच अनेक विरोधीत कमेंटचा वर्षाव होऊ लागला. हि बातमी वाऱ्यासारखी परिसरात व्हाट्सऐप ग्रुपवर पसरू लागली . 
फेसबुकच्या ४२ कमेंट आणि १२ शेअर नंतर तत्काळ राहुल पावळे यांनी दोन दिवसात या रस्त्याच्या बांधकामाचा श्री गणेशा केला. दिवसेंदिवस सोशल मीडियाचा प्रभाव वाढतो आहे. मात्र, तंत्रज्ञान आपल्यासाठी आहे की आपण तंत्रज्ञानासाठी याचा विचार करण्याची गरज आहे. याच्या गैरवापराच्याच जास्त बातम्या येत आहेत पण त्यातून बोध घेणे आवश्यक आहे.
अन्यथा ही वाट आपल्याला चुकीच्या ठिकाणी पोहोचवणार आहे.त्यामुळे चंद्रपुरातील रस्ते जर का बनवायचे असेल तर चंद्रपूरकरांना आता फेसबुकचा आधार वापरकर्त्यांना घेता येणार आहे.
दोन व्यक्तींमधल्या संवादातील सहजता वाढविण्यासाठी तयार झालेले तंत्रज्ञान इतर समाजोपयोगी माहितीच्या देवाण-घेवाणीसाठीही तितकेच उपयोगी पडलेले आहे हे या पोस्ट वरून सिद्ध झाले आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.