Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, जुलै २९, २०१८

परंपरागत गुरूंचे समाज घडविण्यात मोठे योगदान:किशोर जोरगेवार

विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणा-या ४० गुरुवर्यांचा सत्कार
स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
चंद्रपूर/प्रतिनिधी:
प्राचीन काळापासूनच समाजात गुरुला विशेष स्थाण देण्यात आले आहे. मनुष्य जन्मापासूनच त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रक्ष रित्या विविध क्षेत्रातील अनेक गुरुंचे संस्कार होत असते मात्र हे गुरु दुर्लक्षित झाले आहे परंतु त्यांच्याकडून झालेल्या संस्कारातुमच उत्तम समाज घडू शकतो त्यामुळे उत्तम समाज घडवीण्यात परंपरागत गुरूंचे मोठे योगदान असल्याचे मत किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केले. स्व. प्रभाताई जोरगेवार चॅरीटेबल ट्रस्टच्या वतीने आज परंपरागत गुरुंच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. मातोत्री सभागृहात आयोजीत या सत्कार सोहळयात कार्यक्रमाच्या उद्घाटीका म्हणून उषाताई हजारे, प्रमुख पाहुणे प्रा. सुर्यकांत खनके, नगरसेवक सुरेश पचारे, विशाल निंबाळकर, बबनराव फंड, विमल काष्टीया, किशोर पडगेलवार, आशा बुरडकर, दादाजी नंदनवार, किशोर तळवेकर, प्रमिला गटलेवार, नंदा जोशी, वंदना हातगावकर, संतोशी चव्हाण आदि मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना जोरगेवार म्हणाले की, आजवर धनादय, सर्वपरिचीत अश्या व्यक्तींचाच सत्कार केल्या जात होता. मात्र या समाजात असेही गुरु आहेत त्यांनी आपआपल्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करत अणेक विदयार्थी घडवीले. आज या गुरुंमुळे अणेकांना रोजगार मिळाला आहे. असे असले तरी या गुरुकडे आजवर दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या कार्याची पावती म्हणून जिल्ह्यात प्रथमच अश्या अनोख्या सत्कार सोहळयाचे आयोजन केल्या गेल्या असल्याचे त्यांनी यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना सांगीतले.
या सत्कार सोहळ्यात ड्राइंग चित्रकार चंदु पाठक, चित्रकार सुदर्शन बारापात्रे, पोलीस मार्गदर्शक रामदास खुजे, मूर्तीकार वामन बोरसरे, मल्लखांब प्रशिक्षक किशोर पडगेलवार, संगीत शिक्षक किशोर तळवेकर, आखाडा प्रशिक्षक महादेव बेले, कारपेंटर प्रशिक्षक वासुदेव वनकर यासारख्या परंपरागत गुरूंचा सत्कार करण्यात आला यांनी अनेकांना घडविले त्यातून त्यांना स्वयंरोजगार प्राप्त करून दिले त्याबद्दल यांचा विशेष सत्कार संस्थे द्वारे करण्यात आला.
विकलांग सेवा समितीचे अध्यक्ष श्रीराम पान्हेरकर हे नेहमी संस्थेच्या माध्यमातून अंध – अपंगांची मदत करत असतात आजपर्यंत त्यांनी अनेक विकलांग यांना शिलाई मशीन असो किव्हा तीनचाकी सायकल यासारखे अनेक साहित्य वाटप करून त्यांना स्वताच्या पायावर उभे करून त्यांना
 सक्षम केले त्यामुळे त्यांचे समाजात उत्तम योगदान असल्याने त्यांचा सुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला. 

पार पडलेल्या सत्कार सोहळयात विविध क्षेत्रातील जवळपास ४० गुरुवर्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संगीत क्षेत्रात काम करत असतांना अणेकांना संगीताचे धडे देऊन त्यांच्यातील कलाकरांना मंच उपलब्ध करुन देणा-या बंडु देठे यांचे ४४ व्या वर्षात पदार्पण झाल्याने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात उषाताई हजारे, प्रा. सुर्यकांत खनके, सुरेश पचारे, विमल काष्टीया, बंडू देठे, किशोर तळवेकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्तावीक ईरफान शेख यांनी केले तर संचालन एकता बंडावार यांनी केले. या कार्यक्रमाला विविध संघटणांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश बेलखेडे, अमोल शेंडे, पंकज गुप्ता, दर्शन बुरडकर, विनोद गरडवा, सुधीर माजरे, प्रकाश चंदनखेडे, विनोद अनंतवार, हर्षद कानमपल्लीवार, नितीन नागरिकर, मुन्ना जोगी, शंकर दंतुलवार, विजय वरवाडे, राशेद हुसैन, लोकेश कोटरंगे, शांताबाई धांडे, रजनी चिंचोळकर, बबलू मेश्राम, दिलीप बेंडले, रवी करमरकर, सुरज चव्हाण, गौरव जोरगेवार यांची उपस्थिती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.