Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जुलै २७, २०१८

विदाऊट कॉलेज फुल नॉलेज डॉक्टरान चंद्रपुरात उघडला दवाखाना

१२ वी नापास अन डॉक्टर 
चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात बेकायदा वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर मनपाने कारवाईचे पाउल उचलले आहे.ग्रामीण भागासोबत आता शहरातही अनेक बोगस डॉक्टरांनी आपला व्यवसाय थाटला आहे. अशा बोगस डॉक्टरांवर मनपाने करडी नजर ठेवली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे मंगळवारी बंगाली कॅम्पमधील श्यामनगर येथे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरावर कारवाई केली.बोगस डॉक्टरांवर तक्रारी प्रााप्त होताच डॉक्टरांचा छडा लावण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने यंत्रणा कार्यान्वित केली आहे.मिळालेली तक्रारीच्या आधारे बोगस डॉक्टरबाबत माहिती प्राप्त झाल्यानंतर आरोग्य विभागाने धडक देत संबंधित डॉक्टरला त्याच्याकडून मेडिकल कौन्सिलचे सटिर्फिकेट, तसेच रजिस्ट्रेशन नंबर व मेडिकलची डिग्री प्राप्त केलेल्या कॉलेजचे सटिर्फिकेट आदी महापालिकेच्या आरोग्य अधिकार्यांना दाखविण्यास सांगितले.
मात्र सदर डॉक्टर कागदपत्रे सादर करू शकले नाही.त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता न केलेल्या डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली.
खुशाल रामदास खेरा असे या बोगस डॉक्टराचे नाव आहे. मनपाला प्राप्त झाल्या तक्रारीची दखल घेत मनपाच्या आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकाºयांनी बोगस डॉक्टर शोध मोहीम पथकासह शहरात धाडसत्र सुरू केले आहे. दरम्यान, मंगळवारी खेरा हॉस्पिटल श्यामनगर, बंगाली कॅम्प येथे सायंकाळी भेट दिली. तेथे खुशाल रामदास खेरा नावाचा व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करताना दिसून आला.दवाखान्याच्या बाहेर बोर्डवर डॉ. के. आर. खेरा, (बि.ए.एम.एस. (एमडी) ), मुंबई या पदव्यांचा उल्लेख आढळून आला.
 महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम १९६१ च्या कलम ३३ (१) नुसार वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी राज्यात कार्यरत विविध वैद्यकीय परिषदांकडे वैद्यकीय व्यावसायिकाने नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.मात्र दवाखान्यात चौकशी केली असता व्यावसायिक जागेत आयुर्वेदिक औषधीचा वापर तसेच रुग्णांची तपासणी करीत असताना हा डॉक्टर आढळून आला. मात्र त्याच्याकडे कुठलीही वैद्यकीय पदवी वा नोंदणी प्रमाणपत्र आढळून आले नाही. सदर कारवाई मनपाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी अंजली आंबटकर, डॉ. जयश्री वाडे, सहायक पोलीस निरीक्षक निशिकांत रामटेके, औषधी निरीक्षक श्रीकांत फुले यांनी केली.
विशेष म्हणजे सदर बोगस डॉक्टर हा १२ वी पास नसल्याचे आढळून आले.चौकशी दरम्यान सदर व्यवसायिक आयुर्वेदिक औषधीचा वैद्यकीय व्यवसाय करतो, असे आढळून आले. चौकशीत दवाखान्यात आयुर्वेदिक औषधेही आढळून आली. रामनगर ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करून खेरा याला अटक करण्यात आली होती.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.