Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून २१, २०१८

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयावर साईबाबांची कृपादृष्टी

चंद्रपूर वैद्यकीय महाविद्यालयाला ७.५ कोटी रुपयांचा निधी
Shree Saibaba Sanstha donates Rs. 7.5 crores to the government hospital | श्रीसाईबाबा संस्थेकडून शासकीय रुग्णालयाला ७.५ कोटींची देणगीमुंबई/प्रतिनिधी:
भक्तांच्या हाकेला धावून जाणारे बाबा म्हणून प्रसिद्ध असलेल्या साईबाबांच्या कृपादृष्टीने राज्यातील चार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा कायापालट होणार आहे. यवतमाळ, चंद्रपूर, औरंगाबाद आणि नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयांना नवचैतन्य देण्यासाठी शिर्डी संस्थानने तब्बल ७१ कोटी रुपये दान केले आहेत. संस्थानचे अध्यक्ष आणि भाजपा नेते सुरेश हावरे यांनी ही माहिती दिली.
शिर्डी येथील प्रसिद्ध श्री साईबाबा संस्था विश्वस्त मंडळाच्या वतीने चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास साडेसात कोटींची देगणी देण्यात आली. शिर्डी संस्थेने ही रक्कम शासनाकडे जमा केली असून वैद्यकीय शिक्षण विभागाने बुधवारी मंजुरी प्रदान केली. या निधीतून एमआरआय (१.५ टेस्ला) मशिन खरेदी करण्यात येणार आहे. एमआरआय या अत्याधुनिक आरोग्य सुविधांपासून वंचित असलेल्या रुग्णांसाठी ही मशिन संजिवनी ठरणार आहे.देशाच्या धार्मिक क्षेत्रात शिर्डी येथील श्री साईबाबा मंदिरांची मोठी कीर्ती आहे. मंदिराचे दर्शन घेण्यासाठी देशभरातील लाखो भाविक येतात. त्यामुळे दानधर्माच्या माध्यमातून संस्थेच्या उत्पन्नात दरवर्षी वाढ होत आहे. भाविकांना सर्व सोयीसुविधा स्वस्त दरात पुरविले जातात. शिवाय देशातील विविध जिल्ह्यांमध्ये समाजसेवेचे कार्य सुरू आहे. सामाजिक बांधिलकीतून राबविण्यात येणाºया लोकोपयोगी उपक्रमांमुळे संस्थेची प्रतिमा उंचावली. धार्मिक क्षेत्रात प्रतिष्ठा मिळविणाºया या संस्थेने चंद्रपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास तब्बल साडेसात कोटी रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला होता. लगेच अंमलबजावणीही केली. ही रक्कम राज्यशासनाकडे जमा करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाने या निधीतून एमआरआय मशिन (१.५ टेस्ला) घेण्याचा प्रस्ताव तयार केला होता. यंत्रसामुग्री तातडीने खरेदी करण्यासाठी बुधवारी प्रशासकीय मान्यता मिळाली. त्यामुळे गरिबांच्या उपचारासाठी मोठी मदत होणार आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.