आता एकच लक्ष 13 कोटी वृक्ष
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त्य संयुक्त रॅलीजागर
जुलैपासून एक महिना संपूर्ण जिल्हयात वृक्ष लागवडीचा धडक कार्यक्रम राबविण्यात यावा. गेल्या वर्षी चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात दुस-या क्रमांकावर होता. यावेळी मात्र 13 कोटी वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमात चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात अव्वल राहील. यासाठी नियोजन करु या, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आज येथे केले.दिनांक 05 जून 2018 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमीत्य निसर्ग संवर्धन व पर्यावरण जनजागृती वाढविण्यासाठी तसेच सन 2018 चे पावसाळयात 01 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये वृक्ष लागवडीबाबत मोठया प्रमाणात प्रचार व प्रसार व्हावा याकरीता भव्य संयुक्त रॅलीचे वनविभागाच्या वतीने आयोजन करण्यांत आले.
पूर्वी बहुउद्देशिय संस्था, पोंभुर्णा यांनी कलापथकाच्या माध्यमातून पर्यावरण व वृक्ष लागवडबाबत लोकांना संदेश दिला. तसेच पंडीत जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळा, महानगरपालिका, चंद्रपूर येथील शिक्षक उमेश आत्राम यांचे मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी पर्यावरण, वृक्ष लागवड व वन्यजीव संरक्षणाबाबत कलेचे सादरीकरणद्वारे जनजागृती करण्यांत आली.
पर्यावरण दिनाचे औचित्त्याने दिनांक 14 मे 2018 रोजी चंद्रपूर जवळच्या जंगलात बिबटला जेरबंद करण्यांत दाखविलेल्या धैर्याबाबत वनपरीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे चंद्रपूर यांचे महापौर, चंद्रपूर शहर महानगरपालिका यांनी तसेच कार्यक्रमस्थळी मा. श्री. देवरावजी भोंगळे, अध्यक्ष, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांनी शाल व श्रीफळ देवून सत्कार केला.
सदर कार्यक्रमाचे नियोजन विभागीय वनअधिकारी अशोक सोनकुसरे यांचे मार्गदर्शनाखाली वनपरीक्षेत्र अधिकारी, चंद्रपूर व कर्मचारी यांनी केले. सदर कार्यक्रमास प्रामुख्याने श्री. बडकेलवार, समन्वयक अधिकारी, 50 कोटी वृक्ष लागवड, श्री. ब्राम्हणे, श्री. करे, श्री. धोतरे, विभागीय वन अधिकारी व वनविभागाचे, ईतर विभागाचे कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते वनविश्रामगृह परिसरात वृक्षारोपन करण्यांत आले.कार्यक्रमाचे संचालन श्री. शेंडे सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री. संतोष थिपे, वनपरीक्षेत्र अधिकारी (प्रादे.), चंद्रपूर यांनी केले.