भंडारा/प्रतिनिधी:
भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलात असलेल्या शासकीय स्वीमिंग पूलमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तोफिर कय्युम शेख असं मृत अवस्थेत सापडलेल्या मुलाचे नाव आहे.
तोफिर रविवारी 11वाजताच्या दरम्यान घरून वडिलांच्या हात गाडीवर मदत करायला जात असल्याचे सांगून घरून निघाला मात्र तो वडिलांकडे गेलाच नाही. सायंकाळी वडील घरी आल्यावर तोफिरच्या आईला विचाले असता त्यांनी मुलगा तुमच्याकडे आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आले मात्र कुठेही न मिळाल्याने तो हरवल्याची तक्रार भंडारा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.

पण दरम्यान, काल स्वीमिंग पूल बंद असतांना भिंत चढून तोफिर आलाच कसा, त्याच्या सोबतीला अजून कोणी होते का, त्याचे कपडे घटना स्थळावर मिळाले नाही त्यामुळे कपडे कोणी नेले का, ही एक दुर्घटना आहे की कोणी घातपात केला या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.