Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मृतदेह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मृतदेह लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, सप्टेंबर ०४, २०१८

नागपुरात शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह

नागपुरात शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत आढळला महिलेचा मृतदेह

नागपूर:
दारुड्या नवऱ्यानेच केली पत्नीची हत्या 

चंद्रकला राज यादव (वय ३८) असे मृत पत्नीचे नाव

दारू पिऊन पत्नीला रॉडने केली जबर मारहाण

पत्नीचा मृत्यू झाल्याबरोबर शौचालयाच्या पाण्याच्या टाकीत पोत्यात गुंडाळून फेकला मृतदेह

आरोपी राज यादव (वय ४०) सीताबर्डी पोलिसांनी केली अटक



शुक्रवार, ऑगस्ट ०३, २०१८

 तब्बल २० तासानंतर मृतदेह लागले बचाव पथकाच्या हाती

तब्बल २० तासानंतर मृतदेह लागले बचाव पथकाच्या हाती

ललित लांजेवार:

अस्थीविसर्जन कार्यक्रमासाठी गेलेल्या ४ जणांचा नदी प्रवाहात वाहून गेल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास समोर आली होती.त्यातील दोन मुलांचा मृत्यू शुक्रवारी दुपारी बारा वाजताच्या दरम्यान शोधपथकास हाती लागले. केतन भोजराज पोटदुखे 20, विक्की शंकर माहुलीकर 27, असे नाव आहे. हे दोघेही अस्थीविसर्जन कार्यक्रमासाठी गेले होते, यातील दोन जणांना वाचवण्यात उपस्थितांना यश आले होते मात्र हे दोन जण प्रवाहाबरोबर वाहून गेले त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, अंधार पडल्याने शोध पथकाला गुरुवारी खाली हात परत यावे लागले होते, मात्र शुक्रवारी  सकाळी परत शोधकार्य सुरू झाले दरम्यान घटनास्थळापासून काही अंतरावर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस शहराजवळ असलेल्या वर्धा, पैनगंगा आणि निर्गुडा नदीच्या त्रिवेणी संगम असलेल्या वढा तीर्थक्षेत्र येथे  चंद्रपुर येथील रहिवासी नितीन गोवर्धन यांची चंद्रभागा शंकर गोवर्धन यांच्या अस्तिविसर्जनासाठी जवळपास २५ ते ३० लोक गेले होते.
यातील बाबुपेठ येथील रहिवासी असलेले केतन भोजराज पोटदुखे 20, विक्की शंकर माहुलीकर 27, उत्तम सातोबा टेकाम 38, नैनेश शाहा 27  एकूण ४ लोक हे अस्तिविसर्जनानंतर आंघोडीला हे नदीपात्रात उतरले होते.हे चौघेही प्रथमतःपाण्यात वाहून गेले. मात्र उत्तम सातोबा टेकाम व नैनेश शाहा यांना उपस्थित लोकांच्या मदतीने वाचविण्यात आले,यांच्या जाण्याने बाबूपेठ परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.





















रविवार, जुलै १५, २०१८

चंद्रपुरात वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

चंद्रपुरात वाघाचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

चंद्रपूर/ललित लांजेवार:
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात रत्नापुर वनपरिक्षेत्रात एका वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली.
शुक्रवारी सकाळी रत्नापूर-खांडला मार्गापासून २०० मीटरवर वाघाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला.मिळालेल्या माहितीवरून तीन ते चार दिवसांपूर्वी हा वाघ मरण पावला असावा, असा अंदाज वनविभागाने लावला आहे.मात्र हा वाघ कशामुळे मेला ह्याचे कारण समजू शकले नाही.




मंगळवार, जुलै ०३, २०१८

 नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

dead body found in nagpur mla hostelनागपूर/प्रतिनिधी:
राज्य विधीमंडळाचं नागपूर इथं होणाऱ्या पावसाळी अधिवेशन एक दिवसावर असतानाच येथील आमदार निवास भवनात एक मृतदेह आढळून आल्यानं चांगलीच खळबळ उडाली आहे.आमदार निवास भवनातील ४३ क्रमांकाच्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले.मिळालेल्या माहितीवरून मृत व्यक्ती ही मुंबईतील उल्हासनगरच्या आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे स्वीय सचिव यांची स्वीय सहाय्यक (पी.ए.) असल्याचं सांगितलं जातं. विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचा मृत्यू झाल्याची अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या या प्रकरणी पोलिसअधिक तपास करीत आहेत.

सोमवार, जून १८, २०१८

भंडाऱ्यात स्विमिंगपूलमध्ये सापडला मृतदेह

भंडाऱ्यात स्विमिंगपूलमध्ये सापडला मृतदेह

भंडारा/प्रतिनिधी: 
भंडारा जिल्ह्यातील क्रीडा संकुलात असलेल्या शासकीय स्वीमिंग पूलमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. तोफिर कय्युम शेख असं मृत अवस्थेत सापडलेल्या मुलाचे नाव आहे.
तोफिर रविवारी 11वाजताच्या दरम्यान घरून वडिलांच्या हात गाडीवर मदत करायला जात असल्याचे सांगून घरून निघाला मात्र तो वडिलांकडे गेलाच नाही. सायंकाळी वडील घरी आल्यावर तोफिरच्या आईला विचाले असता त्यांनी मुलगा तुमच्याकडे आल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आले मात्र कुठेही न मिळाल्याने तो हरवल्याची तक्रार भंडारा पोलीस स्टेशन मध्ये करण्यात आली.
सोमवारी सकाळी स्वीमिंग पूल उघळल्यावर पाण्यात एक मुलगा तरंगत असल्याचे चौकीदाराला दिसलं. त्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. चौकशी अंती हा हरवलेला तोफिर असल्याचे समोर आले.
पण दरम्यान, काल स्वीमिंग पूल बंद असतांना भिंत चढून तोफिर आलाच कसा, त्याच्या सोबतीला अजून कोणी होते का, त्याचे कपडे घटना स्थळावर मिळाले नाही त्यामुळे कपडे कोणी नेले का, ही एक दुर्घटना आहे की कोणी घातपात केला या दिशेने पोलीस तपास करीत आहेत.