Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

बुधवार, जून २०, २०१८

गुंगीचे औषध देवून शिक्षकाने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

शिक्षकी पेश्याला काळिमा फासणारी घटना;त्या नराधमास केली चिमूर पोलिसांनी अटक 
चिमूर(विनोद शर्मा): 
         शिक्षकी पेशास काळीमा फासणारी दुसरी घटना झाली असून ही घटना नेरी येथील प्रसिद्ध असलेल्या जनता विद्यालय येथील संदीप बोदेले या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर विनयभंग केला असून मुलीच्या तक्रारीवरून चिमूर पोलिसांनी त्या नराधम आरोपी शिक्षक संदीप बोदेले ला अटक करून गुन्हा दाखल केला असून आरोपीचा बीपी वाढल्याने वैधकीय अधिकारी यांनी चंद्रपूर सामान्य रुग्णालयात रेफर केले आहे शिक्षकी पेशात खळबळ माजली आहे 
       चिमूर तालुक्यातील नेरी येथील जनता विद्यालय प्रसिद्ध असून या विद्यालयात संदीप बोदेले शिक्षक कार्यरत असून ती अल्पवयीन मुलगी हि वर्ग ८ वीत असताना तुला गणित विषयात गुण वाढविण्याचे आमिष सदर नराधम शिक्षक देत होता यावरून एसएमएस करीत होता शिकवणी वर्ग ला जात असताना त्या आरोपी शिक्षकाने बोलाविले  मी त्यांच्या घरी गेलो असता मला गुंगीचे पदार्थ देऊन सेवन करण्यास सांगितले ते पदार्थ खाल्ल्याने गुंगी आली चकर येत असल्याने घरी जातो म्हटल्यावर मीच तुझ्या आई वडीलास बोलावून घेतो असे नराधम शिक्षक बोलला नंतर गुंगी आल्यावर माझे कपडे काढून जबरदस्तीने संभोग केला प्रतिकार पण केला सदर घटनेचे कथन आई वडीलास सांगितल्यावर शाळेच्या संचालक मंडळास तक्रार  केली.या घटनेचा तपास व आरोपीस अटक करण्यासाठी चक्रे फिरत असताना आरोपी संदीप बोदेले ला अटक करण्यात आली असून दाखल २३/२८ नुसार गुन्हा २८० /१८१ ,कलम ३७६ सहकलम ४,६ लैगिक शोषण बाल नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीस वैदकीय चाचणी साठी नेले असता त्याची बीपी वाढल्याने त्याला चंद्रपूर सामान्य रुग्णालयात रेफर करण्यात आले असून पुढील तपास ठाणेदार दिनेश लबडे करीत असून शिक्षकी पेशात काळिमा लावणारी घटना घडल्याने खळबळ माजली आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.