Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जून १४, २०१८

पत्रकार दिनेश एकवनकर पर्यावरण मित्र पुरस्काराने सन्मानित

चंद्रपूर/प्रतिनिधी:
महाराष्ट्र नाभिक महामडंळाचे विदर्भ प्रसिद्धी प्रमुख तथा दिनचर्या वर्तमान पत्राचे संपादक दिनेश एकवनकर यांना २०१८ चा पर्यावरण मित्र पुरस्कारानी सन्मानीत करण्यात आले.दिनेश एकवनकर हे नाभिक समाजाच्या समाजकार्या बरोबर ते पत्रकार, आणी पर्यावरणासाठी नेहमी सर्कीय सहभाग दर्शवितात. आपल्या वृतपत्राच्या दिनचर्या दिनदर्शीकेतून ‘झाडे लावा झाडे जगवा‘ पाणी अडवा पाणी जिरवा, प्रदुषणमुक्त, ‘स्वच्छ भारत‘ असा प्रसार आपल्या वर्तमान पत्रातून जन जागृती करीत असतात.त्यांचा अशा विविध सामाजिक समाज उपक्रमाची दखल घेवून तसेच जागतीक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून पर्यावरण संवर्धन व विकास समितीच्या वतीने पर्यावरण मेळाव्यात हा पूरस्कार मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आला. जिल्हापरिषद कन्नमवार सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटक मोरेश्वर टेमुर्डे, माजी विधानसभा उपाध्यक्ष महाराष्ट्र्राज्य, तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डि. के. आरिकर संस्थापक, पर्यावरण संवर्धन व विकास समिती,राष्ट्र्वादी कॉंग्रेस पार्टीचे महासचिव हिराचंदजी बोरकूटे, गडचांदूरच्या नगराध्यक्षा सौ.विजयालक्ष्मी डोहे,गोंडपिपरीचे नगराध्यक्ष मा. संजय झाडे, मा. निपचंद शेरकी अध्यक्ष,रयत नागरी सह.पत संस्था मूलयांची मंचावर प्रामुख्याने उपस्थीती होती.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.