केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश
चंद्रपूर/प्रतिनिधी:
विसापूर ग्रा.पं.चे सरपंच तसेच विसापूर वासीयांनी केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर यांना निवेदन सादर करून अंडरपास पुलाची उभारणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. या मागणीची त्वरित दखल घेत ना. अहीर यांनी या संदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्रालयास पत्रा पाठवुन या ठिकाणी तातडीने अंडरटाईप रेल्वे पुलाचे बांधकाम करण्याची सुचना केली होती.
बल्लारपूर तालुक्यातील विसापूर हे 15 हजार लोकसंख्येचे गाव मध्य रेल्वेच्या लाईनवर पूर्व, पश्चिम बाजुने वसलेला असून येथील नागरिकांना रेल्वे गेट मधून येणे-जाणे करावे लागत होते. त्यामुळे तीन रेल्वेलाईनमधुन मार्गक्रमण करतांना नागरिकांना कायम अपघाताची भीती होती व तशा दुर्घटनासुध्दा या ठिकाणी घडल्या होत्या. हा गंभीर प्रकार थांबविण्यासाठी या पुलाची अत्यावश्यकता असल्याची बाब केंद्रीय गृह राज्यमंत्राी हंसराज अहीर रेल्वे मंत्रालयातील वरीष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणुन दिली होती. त्यामुळे या गंभीर बाबीची दखल घेत या अंडरटाईप रेल्वे पुलास मान्यता प्रदान करून त्याच्या बांधकामासाठी कार्यवाही लवकरच सुरू होणार असल्याने विसापूरवासीय नागरिकांना या पुलामुळे येणे-जाणे करण्यास फार मोठी सोय उपलब्ध होणार आहे.