Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १२, २०१८

पिसाळलेल्या मधमाशांमुळे वृध्द गंभीर

चंद्रपूर : उत्तम आरोग्य लाभावे आणि तंदुरुस्तीसाठी अनेकजण प्रातकाळी गावाबाहेर फि रायला जातात़ अशाच एका वृध्दाला हे फि रणे महागात पडले़ पिसाळलेल्या मधमाशांनी हल्ला केल्याने वृध्द गंभीर जखमी झाला़ त्याचवेळी शेजारीच व्यायाम करणाºया गूड मार्निंग ग्रुपच्या पदाधिकाºयांनी हा प्रकार लक्षात येताच वृद्धाचे जीव वाचविण्यासाठी धाव घेतली़ मारोती धानोरकर, वय ७० असे या जखमीचे नाव आहे़
शहरालगतच्या जुनोना फ ाट्यापासून ३ किलोमीटर अंतरावर मारोती धानोरकर हे रस्त्याने फि रत असताना झाडावर बसलेल्या मशमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला़ काही कळायच्या आतच त्यांना घेरले आणि संपूर्ण शरिरावर चावा घेतला़ ही बाब बाबूपेठ येथील गूड मार्निंग ग्रुपच्या पदाधिकाºयांना कळली़ त्यांनी मदतीसाठी धाव घेतली़ चारचाकी वाहन बोलाविण्यात आले़ काहींनी अंगावर चादर टाकण्याचा प्रयत्न केला़ त्यातील एका पदाधिकाºयांवरही मधमाशांनी हल्ला चढविला़ काहींनी आग पेटवून धुवा करण्याची युक्ती सूचविली़ आग पेटविण्यात आली़ सभोवताल धुव्वा झाला़ तेव्हा मधमाशांनी पळ काढला़ दरम्यान, मदतीसाठी आरोग्य विभागाच्या १०८ क्रमांकावर संपर्क साधण्यात आला़ मात्र, कोणतीही मदत मिळाली नाही़ मदत करणाºयात मोहन तन्नीरवार, संजय बोरकर, प्रशांत वालदे, पुरुषोत्तम चौधरी, रामबाबू, मनोहर बोम्बेवार, आबाजी शेंडे, कामडी, विमल पाटील, शेखर साव आणि एऩ मानकर यांचा समावेश आहे़

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.