Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जून १२, २०१८

वडेट्टीवारांच्या देखरेखीत राहुल गांधीच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु

Arrangements for Rahul Gandhi's tour is going on for a war-footing | राहुल गांधी यांच्या दौऱ्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू
चंद्रपूर/प्रतिनिधी:
एचएमटीचे तांदळाचे जनक दादाजी खोब्रागडे यांच्या परीवाराच्या सांत्वन भेटीसाठी व शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी बुधवारी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे बुधवारी चंद्रपूर जिल्ह्यातील नांदेड या गावी येत आहेत. या कार्यक्रमाची तयारी युद्धपातळीवर सुरू आहे. राहुल गांधी यांच्या या दौर्यासाठी दिल्लीच्या एसपीजी कार्यालयातील अधिकारी या तयारीवर लक्ष ठेवून आहेत.
राहुल गांधी दिल्लीवरून नागपूरला आल्यानंतर ते हेलीकॉप्टरने नांदेड येथे येणार आहेत. त्यासाठी हेलीपॅडची निर्मिती करण्यात येत आहे. ज्या जागेवर हेलीपॅड तयार करण्यात आले ती जागा यासाठी योग्य आहे की नाही याची ट्रायल आज हेलीकॉप्टर उतवून घेण्यात आली. हेलीकॉप्टरचा आवाज ऐकताच हेलीपॅडच्या दिशेने  परिसरातील नागरिकांनी चांगलीच गर्दी केली.मात्र पोलीस दल त्याठिकाणी असल्याने नागरिक मुकाट्याने एका ठिकाणी राहून बघत होते. दादाजींच्या कुटुंबीयांच्या भेटीनंतर राहुल गांधी शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. हि संपूर्ण कार्यक्रमाची तयारी  आमदार विजय वडेट्टीवार, माजी आमदार अविनाश वारजूकर यांच्या निगराणी खाली सुरू आहेत.
कार्यक्रमादरम्यान कुठलाही गोंधळ उडू नये म्हणून ५०० हून अधिक पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात करण्यात येणार आहे. या सर्व तयारीवर चंद्रपूरच्या जिल्हा पोलीस अधीक्षक नियती ठाकर लक्ष ठेवून आहेत.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.