Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ११, २०१८

नागपुरात प्रशिक्षकाचा विद्यार्थीनीवर बलात्कार

नागपूर/प्रातिनिधी:
मालिश करण्याच्या बहाण्याने घरी नेऊन कुस्तीच्या एका प्रशिक्षकाने विद्यार्थीनीवर (वय १८) बलात्कार केला. सक्करदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही संतापजनक घटना घडली. गुरुवारी या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
अजय मलिक (वय २२) असे आरोपीचे नाव आहे. तो ओमनगरातील नागमंदीराजवळ राहतो. सक्करद-यातील एका शाळेत विविध प्रकारच्या खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर सुरू आहे. पीडित विद्यार्थीनी दोन आठवड्यांपूर्वी या शिबीरात कुस्तीचे प्रशिण घेण्यासाठी सहभागी झाली होती. आरोपी अजय मलिक हा तेथे मुलींना कुस्तीचे धडे देत होता
 मालिश शिवाय शरिर दणकट होत नाही आणि शरिर दणकट असल्याशिवाय कुस्तीगीर टिकत नाही, असे तो विद्यार्थ्यांना सांगायचा. त्याने पीडित मुलीलाही मालिश करण्याचा आणि शिकून घेण्याचा हट्ट धरला होता. गुरुवारी सकाळी पीडित मुलीने प्रॅक्टीस केल्यानंतर ७ वाजता तिने नकार देऊनही तो तिला जबरदस्तीने आपल्या घरी मालिश करण्यासाठी घेऊन गेला. एका रुममध्ये नेल्यावर त्याने तिला थेट कपडे काढण्यास सांगितले. तिने नकार दिला. यावेळी त्याने तिला बाध्य केले आणि मालिश करण्याच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केला.
पीडित मुलीने घरी आल्यानंतर आपल्या पालकांना हा गैरप्रकार सांगितला. पालकांनी सक्करदरा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार सांदिपान पवार यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने लगेच गुन्हा दाखल करू घेत आरोपीला अटक केली.
-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.