Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मे ११, २०१८

काव्यशिल्पच्या बातमी नंतर महावितरणचे नागरिकांना आव्हाहन;पालिकेला पत्र

चंद्रपूर/प्रतिनिधी:
गुरुवारी सकाळी चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी यांचे बंगल्या नजीक असलेल्या महावितरणच्या विद्युत डीपी खाली कचरा जाळण्यात आला होता.ह्या जळणाऱ्या आगीने महावितरणच्या विद्युत डीपीला देखील आपल्या कवेत घेतले होते,हि बाब काव्यशिल्प डिजिटल मिडीयाने मनपा व महावितरणाच्या अधिकारी यांना   लक्षात  आणून दिली.त्यानंतर महवितारणाने उघड्यावर वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच विज वितरण कंपनीलाही नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. यामुळे वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आव्हाहन करण्यात आले.
 शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पीलर, वितरण रोहीत्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघडयावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या  वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. सध्या तापमानही दिवसेंदिवस वाढत असल्याने कचऱ्यास आग लागण्याचे प्रकारही वाढत आहेत.
     वीजयंत्रणाही उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच वीजवितरण यंत्रणेजवळचेे तापमान अश्या आगीमुळे वाढल्यास यंत्रणेलाही त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कचऱ्याचे ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. शहरातील तसेच जिल्हयातील नागरिकांनी उघडयावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. 
मागील महिण्यात चंद्रपूर शहरातील कोसारा परिसरात अशाप्रकारे आग लागून वीजपुरवठा तीन तास बाधित झाला होता. अशाप्रकारच्या घटना  घडून वीजग्राहकांना विनाकारण त्रास होवू नये यासाठी महावितरणने चंद्रपूर महानगरपालिकेला पत्र लिहून सहकार्य करण्याची विनंती केली आहे. ग्राहकांनीही वितरणला सहकार्य करावे व अशा घटनांतून वीजयंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास 1912 किंवा 1800-233-3435 किंवा 1800-102-3435 या टोल फ्री क्रमांकांवर तसेच 7875761195 या नियंत्रण कक्षाच्या क्रमांकावर  माहिती द्यावी असे आवाहन चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. दिलीप घुगल यांनी केले आहे.                     


-----------------------------------------------------------------------
जाहिरात...
भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:९१७५९३७९२५ या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध) 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.