गडचिरोली/प्रतिनिधी:
माओवाद्यांकडून एकाची हत्या करण्यात आलीये. माओवाद्यांकडून गोळ्या झाडून ही करण्यात आली आहे. धानोरा तालुक्यातील होरेकसा येथील रहिवासी असलेल्या पांडुरंग पदा यांची हत्या करण्यात आल्यानं एकच खळबळ उडालीये. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं कळतंय. गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीत नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये मोठ्या प्रमाणात माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं होत्या. दरम्यान आता नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेल्या या हत्येमुळे पुन्हा एकदा तणावाचं वातावरण गडचिरोलीत निर्माण झालंय.
शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास ३० ते ४० सशस्त्र नक्षलवादी पांडुरंगच्या घरी गेले. त्यांनी पांडुरंगला झोपेतून उठवून दोनशे मीटर अंतरावर असलेल्या त्याच्या शेतात नेले आणि चेहऱ्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे.
घटनास्थळी नक्षल्यांनी पत्रक टाकल्याचे आढळून आले आहे. ८ मे २०१६ रोजी जहाल नक्षलवादी व चातगाव एरिया कमिटीची सचिव रजिता उर्फ रामको ऋषी उसेंडी पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाली होती. तिची माहिती पांडुरंग पदा यानेच दिली, असा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.