नागपूर:/प्रतिनिधी:
गोंडखैरी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात एका १९ व धारधार श र्षीय तरुणाची धारधार शस्त्राच्या सहाय्याने हल्ला करून हत्या करण्यात आल्याची घटना शनिवारी सकाळी उजेळातआली. नंदकिशोर दिनेश भोसले वय १९ वर्षे असे या मृतकाचे नावअसून रोजी शुक्रवारी रात्री १२ ते १ च्या दरम्यान हि घटना घडली असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहिती नुसार ४ ते ५ आरोपींनी पूर्ववैमन्यसातून नंदकिशोरची हत्या करण्यात आल्याचा संशय वर्तविला जात आहे.या संबंधी संपूर्ण चौकशी पोलीस करीत असून पोलीस आरोपीच्या मागावर आहेत. सध्या नागपूर दररोज होणाऱ्या खुनाच्या घटनेनी हादरून गेले असून आठवडाभरात ५ खून झाल्याने शांतता व सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होऊ लागले आहे,