Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, मे १७, २०१८

बाबुपेठ रेल्वे उड्डाण पुल निर्मितीचा मार्ग मोकळा

अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसानभरपाई
 देण्याबाबत अनुकूल निर्णय
चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर शहरातील अनेक वर्षे तांत्रिक आणि अधिग्रहणाच्या कामाने रखडलेला बाबुपेठ रेल्वे उड्डाण पूल साकारण्याचा मार्ग राज्य शासनाच्या ऐतिहासिक निर्णयाने मोकळा झाला आहे. राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी विशेष बाब म्हणून सरकारी जमिनीवरील अतिक्रमणधारकांना एकरकमी नुकसानभरपाई देण्याबाबत अनुकूल निर्णय दिला आहे. या उड्डाण पुलाचा आरखडा, निधी आणि तांत्रिक मंजुरी होऊनही अपेक्षित जागेवरील अतिक्रमण केलेल्या रहिवाशाना न्याय देण्याच्या दृष्टीने पावले उचलली गेली होती. त्यानुसार या रहिवाशांना दिलासा देण्यासाठी एक उच्चस्तरीय सचिव गट निर्माण करण्यात आला होता. या समितीने सकारात्मक अहवाल दिला असून बाबुपेठ उड्डाण पुलाच्या प्रस्तावित जागेवरील अतिक्रमणधारकांना आता एकरकमी नुकसानभरपाई मिळणार आहे. पालकमंत्री  सुधीर मुनगंटीवार यांनी या अतिक्रमणधारकांचा नुकसानभरपाईसाठी सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा यासाठी मंत्रिमंडळात हा विषय लावून धरला होता तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे २५ कोटी रु. निधी वळता करण्यात आला होता . यासोबतच केंद्र शासनाच्या स्तरावर रेल्वे विभागाशी संबंधित अडचणी दूर करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी रेल्वे विभागाच्या पहिल्या अर्थ संकल्पात बाबुपेठ उडाणपुलाला मंजुरी मिळवून देण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले होते. बाबुपेठच्या नागरिकांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर आ. नानाजी शामकुळे यांनी मनपा ते मुख्यमंत्री असा संपर्क ठेऊन उड्डाण पुलाचे काम तडीस नेण्यासाठी प्रयत्न चालविले होते.
उड्डाण पुलाच्या जागेवरील ६८ मालमत्ताधारकांना सन २०१५ च्या दरसुचीनुसार ३,१५,०५,६३५ रु. मोबदला प्रस्ताव पाठविण्यात आला आहे तर रेल्वेच्या जागेवरील ७३ मालमत्ताधारकांसाठी ९५,४९,७७२ रु. चा प्रस्ताव आहे. एकूण ४,१०,५५,४०७ रु. च्या निधीची यासाठी आवश्यकता आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाने बाबुपेठ उड्डाणपुलाच्या निर्मितीतील सर्व अडथळे दूर झाले असून सुमारे ६२ कोटी रु. निधी खर्चून उभारण्यात आलेल्या पुलाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
                                   -----------------------------------------------------------------------
जाहिरात...



भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).

Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.