Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १५, २०१८

रामपूरी गावातील २३ घरे "सौभाग्य"योजनेत उजळणार

नागपूर/प्रतिनिधी:
प्रधानमंत्री सहज बिजली हार घर योजने अंतर्गत सावनेर तालुक्यातील रामपूर येथील २३ घरे येत्या दोन दिवसात पूर्णपणे उजळणार आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्य सुरु करण्यात आलेल्या ग्राम स्वराज्य योजनेत ज्या गावात ८० टक्के पेक्षा जास्त जनता दलित आहे आणि गरीब कुटुंबातील आहे अश्या गावातील सर्व घरांचे विदुयतीकरण करण्याची योजना महावितरणकडून आखण्यात आली आहे. राज्यात अश्या गावाची संख्या १९२ तर नागपूर जिल्ह्यात ४ गावांचा समावेश या योजनेत समावेश करण्यात आला आहे.
सावनेर तालुक्यातील रामपूरी येथे आज उकठराव नागपुरे आणि लक्ष्मण वरखेडे या दोन वीज ग्राहकांना कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे , नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या मुख्य उपस्थित वीज जोडणी देण्यात आली. रामपूर गावाची लोकसंख्या १००९ असून येथे सध्या २५२ वीज ग्राहक आहेत. येथे सौभाग्य योजनेत एकूण २३ लाभार्थ्यांना वीज जोडणी देण्याचे निर्धारित करण्यात आले असून उर्वरित वीज जोडण्या रविवार दिनांक १५ एप्रिल पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. कार्यक्रमास रामपूरीच्या सरपंच सविता डबले,मुख्य अभियंता रफिक शेख, अधीक्षक अभियंता नारायण आमझरे, कार्यकारी अभियंता डी. एन. साळी उपस्थित होते.या योजनेमुळे रामपूरी गावात ३१ मार्च २०१८ पूर्वी असलेल्या सर्व घरांना वीज जोडणी देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील महावितरणच्या कन्हान उपविभागात येणाऱ्या सिहोरा येथील १९, भिवापूर उपविभाग येणाऱ्या धुरखेडा येथील ५५ आणि सावरगाव उपविभागातील खेडी-गवरगोंडी येथील ७ वीज ग्राहकांना येत्या काही दिवसात वीज जोडण्या देण्यात येणार आहे.फोटो ओळ- सौभाग्य योजनेतील लाभार्थी सोबत कार्यकारी संचालक रेशमे ,प्रादेशिक संचालक  खंडाईत व अन्य मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत.                                      


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.