कुठे, मावळली अंधाराची भिती अन् मिळाळे प्रगतीच्या
प्रकाषकिरणांनी भरारी घेण्यास बळ
कुठे उगवली ..आयुश्याच्या संध्याकाळी सोनेरी पहाट
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयातर्फे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिन ग्राम स्वराज्य अभियानाच्या माध्यमातून सौभाग्य योजनेतून चंद्रपूर परिमंडळातील 15 गावात एकंदरीत 100 टक्के विद्युतीकरण करण्यात आले. या अभियानांतर्गत चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील एकंदरीत 1903 कुटूुंबाना चंद्र, सुर्य, कंदील, दिवाबत्तीच्या प्रकाशानंतर आता महावितरणच्या वीजेचा प्रकाष अनुभवायला मिळाला आहे.
एकीकडे शहरातील जीवन, माहिती तंत्रज्ञानाच्या युगात वावरतांना, विज्ञान तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करत असतांना, अनेक सेायीसुविधांचा लाभ घेत असतांना वीजेसारख्या प्राथमिक गरजेशिवाय हि कुटूंबे अनेक वर्षे धारात जीवन जगत होती. 14 एप्रिल 2018 ते 30 एप्रिल 2018 या दोन आठवडयात महावितरणने चंद्रपूर परिमंडळाने या 1903 कुटंूंबाना प्रकाश देत त्यांची थी प्राथमिक गरज पूर्ण केली व त्यांना प्रकाशाची वाट उपलब्ध करून दिली.
गडचिरोलीसारख्या दुर्गम जिल्हयातील मुलचेरा तालुक्यातील- अडपल्ली येथे 70 अहेरी तालुक्यातील महागाव येथे 83, छल्लेवाडा येथे 264, चेरपल्ली येथे 71, गोविंदगाव येथे 76, सिरोंचा तालुक्यातील नाडीगुडा 257 जाफराबाद येथे 164 व गुमलकोंडा येथे 174 अशा 8गावातील 1156 कुटूंबात तर, चंद्रपूर जिल्हयातील - जिवती तालुक्यातील येल्लापूर 142, गुडसेल्ला येथे 155 व कुंभेझरी 337, चिमूर तालुक्यातील वडसी 52, ब्रम्हपुरी तालुक्यातील कहाली येथे 17, चंद्रपूर तालुक्यातील चिचपल्ली येथे 34 व गेांडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथे 7 अशा 7 गावातील 744 कुटूुंबाना चंद्र, सुर्य, कंदील, दिवाबत्तीच्या प्रकाशानंतर महावितरणच्या वीजेच्या प्रकाशाने स्वयंपूर्ण झाली आहेत.
गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव मध्ये राहणारे गजानन फुलझेले व त्यांची पत्नी अंधारात जीवन जगात असतांना त्यांच्या जीवनातील काळोख संपुष्टात आला, तर, जिवती तालुक्यातील विष्वनाथ भालेराव या जिवती तालुक्यातील वयोवृध्द कुटंबाच्या जीवनात प्रकाष पोहोचला. आयुष्याच्या संध्याकाळी या दाम्पत्याच्या जीवनात प्रकाशाची पहाट उगवली ,चिमूर तालुक्यातील वडसी येथिल केमा जांभुळे यांच्या जीवनात ग्रामस्वाराज्य अभियानान प्रकाशाचा सुर्य आणला. विस्तारी कंटीवार, व त्यांची पत्नी हे मोलमजुरी करून जगणारे चेरपिल्लीतील कुटूंब आता वीज आल्याने प्रफुल्लीत झाले आहे.
जिवती तालुक्यातील कुम्भेझरी येथिल गणपती हरगिले यांच्याही जीवनात आलेल्या प्रकाषाने महत्वाची भुमिका बजावली आहे घरी वीज नसतांना घरातील दिव्यांग बालकांस अंधारात वावरने कठीण होते. प्रकाशामुळे आता त्यांच्या जीवनात उमेदीची नवी किरणे डोकावली आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील बोरगाव येथिल साजन तुलशिमानकर व त्यांची पत्नी मोलमजूरी करून जगतांना वीजेची गरज पूर्ण झाल्याने समाधानी आहेत तर जिवती तालुक्यातील येल्लापूर बालाजी बन्सोड आता मुलाच्या शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधानी आहेत.
सरला राजन्ना अंगूरवार व त्यांच्या दोन लहानग्या- शिवानी ६ वर्षे व अंजली;5 वर्ष व लहानगा कार्तिकसाठी;3वर्ष आता वीज आल्याने अंधाराची भिती मावळली असून प्रगतीची प्रकाशकिरणे उंच भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंख्याना बळ देत आहे. महावितरणने ग्रामस्वाराज्य अभियानाच्या माध्यमातून कुठे नवीन पंखांना बळ मिळत आहे, तर कुठे जीवनातील अंधार संपूर्ण जीवनचित्रात नवे उमेदीचे, स्वप्नांचे रंग फुलत आहेत. या योजनेमुळे, गजानन फुलझेले, विष्वनाथ भालेराव, केमा जांभुळे,या सारख्या वयोवृध्द नागरीकांनी संपूर्ण जीवन वीजेषिवाय जगल्यांनतर आता त्यंाच्या जीवनाच्या सायंकाळी प्रकाषाची नवी पहाट उगवली आहे.