चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर महानगरपालिकेतील बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक ४ चे अपक्ष नगरसेवक अजय सरकार यांचे गाडीवर गुरुवारी रात्री अनोळखी इसमांकडून हल्ला करण्यात आला,नगरसेवक अजय सरकार रात्री १२ वाजता आपल्या चारचाकी वाहन MH 34.K.6709 वेर्णा या वाहनांने आपल्या कार्यालयासमोर आले.व आपले वाहन पार्क केले असता,तेथून अर्द्यातासात अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गाडीच्या मोठ्या दगडाने काचा फोडल्या. हा संपूर्ण प्रकार अजय सरकार यांच्या कार्यालयाबाहेर लागून असलेल्या CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. या आधी देखील २०११ व २०१५ मध्ये अजय सरकार यांचेवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची तक्रार नगरसेवक अजय सरकार यांनी रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे