Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

नगरसेवक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
नगरसेवक लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, ऑगस्ट १७, २०१८

वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या नगरसेवकाची धुलाई

वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या नगरसेवकाची धुलाई

councilor beaten by mob in aurangabad on opposing atal bihari vajpayee prayer meet
औरंगाबाद/प्रतिनिधी:
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या श्रद्धांजली प्रस्तावाला विरोध करणाऱ्या औरंगाबादचे एमआयएम नगरसेवक सय्यद मतीन यांना भाजप नगरसेवकांनी शुक्रवारी महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत चांगलेच धुतले . यावेळी सय्यद मतीन यांना कायमस्वरूपी निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.





सोमवार, ऑगस्ट ०६, २०१८

चंद्रपुरात नगरसेवक अन नागरिकांवर आली प्लंबरगिरीची वेळ

चंद्रपुरात नगरसेवक अन नागरिकांवर आली प्लंबरगिरीची वेळ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 शहराला विविध प्रभागात खासगी कंपनीकडून पाणी पुरवठा केला जाते. मात्र अनेक ठिकाणी पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत पाणी पुरवठा कंपनीकडे अनेकदा तक्रार करूनही दुर्लक्षच केल्याने स्थानिक नागरिक व नगरसेवक पप्पु देशमुख यांनी पुढाकार घेत लिकेज दुरूस्त केले.त्यामुळे प्रशासनाच्या मुजोरकि पणामुळे नागरिकांना आणि नगरसेवकावर चक्क प्लंबरगिरीची वेळ आली आहे, त्यामुळे पाणी पुरवठा कंपनी व मनपा प्रशासनाप्रति नागरिकांत रोष पसरला आहे.
रविवारी सकाळी ७ वाजता वडगाव प्रभागाचे नगरसेवक पप्पू देशमुख यांना दत्तनगर परिसरातील नागरिकांनी फोन करून मागिल अनेक महिन्यांपासून दत्तनगरमध्ये पाण्याचा अनियमित पाणी पुरवठा होत असल्याची तक्रार केली. पाईपलाईन लिकेज असल्याने गढुळ पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांनी सांगितले. तेव्हा नगरसेवक पप्पु देशमुख व नागरिकांनी नागपूर मार्गावरील अंजीकर शोरूम जवळील पुलाखाली असलेला लिकेज शोधून काढला. याबाबत नागरिकांनी उज्वल कन्स्ट्रक्शन या पाणी पुरवठा कंपनीला फोन करून माहिती दिली. मात्र समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही. रविवार दिवस असल्यामुळे तांत्रिक कामगार सुद्धा त्वरित येणार नाहीत, याची कल्पना नागरिकांना आली.
त्यामुळे नगरसेवक पप्पु देशमुख व प्रभागातील नागरिक दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे, केशव दारवणकर, महेंद्र राळे, गुलाबराव पुनवटकर, विश्वनाथ नक्षिणे, खेमराज चिवडे त्यांनी स्वत:च लिकेज दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला. दुर्गेश गिरडकर, गजानन झोडे यांनी आपल्याकडील पाईप दुरूस्तीचे साहित्य आणले. सर्वजण नाल्यात उतरले आणि ज्या ठिकाणी पाईपलाईन लिकेज होती, त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरू केले.
अशाप्रकारे नागरिकांनी व नगरसेवकाने स्वत: पुढाकार घेऊन लिकेज बंद केला. लिकेजमुळे विनाकारण पाणी वाया जात असल्याची माहिती दिल्यानंतरही उज्वल कंस्ट्रक्शन कंपनीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप पर्यावरणवादी कार्यकर्ते महेंद्र राळे यांनी केला आहे. शहर अजून पाणीटंचाईच्या धोक्यातून सावरलेला नसताना अशा समस्यांची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. मात्र महानगरपालिका प्रशासनही याकडे दुर्लक्ष का करीत आहे, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.
मनपा व पाणी पुरवठा कंपनीच्या कारभारावर प्रभागातील नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात असून पालिकेने वेळीच याकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
मनपा करत आहे जाणिवपूर्वक दुर्लक्ष
शहरात अजूनही एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. दत्तनगर व वडगाव प्रभागातील अनेक ठिकाणी अनियमित पाणी पुरवठा होतो. नागरिकांना पाणी मिळत नसल्याच्या लेखी तक्रारी महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार देण्यात आल्या. आमसभेमध्येही हा प्रश्न वेळोवेळी उचलून धरला. परंतु, मनपा प्रशासन पाणीपुरवठा करणाऱ्या कंपनीविरूद्ध कठोर कारवाई करण्यास जाणीवपूर्वक टाळत आहे. विवेकानंदनगर, लक्ष्मीनगर, पीडब्ल्यूडी कॉर्टर, दत्तनगर, सिव्हील लाईन परिसरातील नागरिकांकडून अनेकवेळा लेखी तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र मनपा याकडे दुर्लक्षच करीत असल्याचा आरोप नगरसेवक पप्पू देशमुख यांनी केला आहे. आतातरी पालिकेने पाणी समस्येकडे लक्ष देऊन नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्याची मागणी त्यांनी व वॉर्डातील नागरिकांनी केली आहे.


शनिवार, जून ०२, २०१८

नगरसेविकेने ठोकले पाणी कार्यालयाला कुलूप

नगरसेविकेने ठोकले पाणी कार्यालयाला कुलूप

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
हिंदुस्तान लालपेठ प्रभाग क्रमांक १६ मध्ये गेल्या ४-५  दिवसांपासून पाणी नियमित येत नसल्याने हिंदुस्तान लालपेठ प्रभाग क्रमांक १६ च्या भाजपच्या नगरसेविका ज्योति गणेश गेडाम यांनी बाबूपेठ परिसरातील  बायपास रोड स्थित पाण्याच्या टाकी कार्यालयाला कुलूप ठोकले.विशेष म्हणजे ज्योती गणेश गेडाम या भाजपच्या नगरसेविका आहेत आणि त्यांच्याच प्रभागात पाणी नियमित येत नसल्याची नागरिकांनी तक्रार केली होती. नगरसेविका गेडाम यांनी या तक्रारीचा पाठपुरवठा संबंधित अधिकाऱ्याकडे केला होता मात्र त्यावर लक्ष नही दिला .  अखेर  नगरसेविका ज्योती गेडाम यांनी स्वतः या पाण्याच्या टाकी कार्यालयात आकस्मित भेट दिली आणि बघितले असता वालमन  उपस्थित असून पाणी देखील उपलब्ध होते. मात्र पाणी नियमित सोडल्या जात नसल्याने संतापलेल्या नगरसेविका ज्योति गणेश गेडाम यांनी स्वतःह  बाबूपेठ परिसरातील  बायपास रोड येथील पाण्याची टाकी कार्यालयाला कुलूप ठोकले.हा परिसत झोन क्रमांक २ मध्ये येत असून या झोनचे सभापती शाम कनकम याच हिंदुस्तान लालपेठ प्रभाग क्रमांक १६ चे नगरसेवक आहेत.
                                         -----------------------------------------------------------------------             
जाहिरात...


भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

बुधवार, मे १६, २०१८

मतांचा घोडेबाजार थांबविण्यासाठी नगरसेवकांना पाठविले सहलीला

मतांचा घोडेबाजार थांबविण्यासाठी नगरसेवकांना पाठविले सहलीला

नागपूर/ललित लांजेवार:
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या तीन जिल्ह्यांतील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक येत्या २१ मे रोजी होणार आहे.त्यामुळे सध्या या तीन जिल्ह्यात राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे,अश्यातच आपल्या नगरसेवकाची व पक्षाच्या मतदारांची पळवापळवी होऊ नये व घोडेबाजार होण्याच्या भीतीने पक्ष्याच्या दबावामुळे भाजपच्या तब्बल २५ हून अधिक नगरसेवकांना त्यांच्या परिवारासोबत थंड हवेच्या ठिकाणी पाठवन्यात आल्याची माहीती सूत्रांकडून देण्यात येत आहे. यात जि.प. सदस्य,नगरससेवक,यांचा असल्याचे समजते.चंद्रपुर येथील 2 खाजगी ट्रॅव्हल्सने हे संपूर्ण नगरसेवक सहलीला निघाले आहे.ही सहल मंगळवारी निघणार होती मात्र काही कारणास्तव उशीर झाला व ते बुधवारी दुपारी निघाले.
येत्या २१ मे रोजी हि चुरशीची लढत होणार आहे,या मतदार संघात भाजपकडून रामदास आंबटकर, काँग्रेसकडून इंद्रकुमार सराफ,सौरभ तिमांडे (अपक्ष), जगदीश टावरी (अपक्ष) हे उमेदवार रिंगणात आहे.मतदानाचे दिवस जवळ येत असतांना बघत या निवळनुकीला आता ज्वर चढू लागला आहे. सध्या ही जागा भाजपच्याच ताब्यात असल्याने त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. या पार्श्‍वभूमीवर गेल्या रविवारी रामदासपेठेतील हॉटेल सेंटर पॉइंटमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते, परिवहनमंत्री नितीन गडकरी, राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या तिन्ही जिल्ह्यांतील नगरसेवक, जि. प. सदस्यांची बैठक घेतली. या बैठकीत आमदारही उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री गडकरी यांनी यावेळी सर्वच नगरसेवक, जि.प. सदस्यांना कुठल्याही स्थितीत ही निवडणूक जिंकणे आवश्‍यक असून निष्ठेने कामाला लागण्याचा सल्ला दिला.या निवडणुकीत विजयासाठी मतदारांचे आवश्‍यक संख्याबळ भाजपकडे आहे. मात्र, या तिन्ही जिल्ह्यांतील भाजपच्या ताब्यातील नगरपालिका, महानगरपालिकेच्या हद्दीत अनेक विकासकामे थेट सार्वजनिक बांधकाम खात्याकडून होत असल्याने नगरसेवकांत नाराजीचा सूर आहे.त्यामुळे अनेक नगरसेवक हे नाराज आहेत, पक्षश्रेष्ठींनी निष्ठेने लढत जिंकून आण्यासाठी आदेश दिल्याने यात बहुतांश नगरसेवकांचे चेहरे लटकलेले असल्याची चर्चा आहे.
                                  ----------------------------------------------------------------------
जाहिरात...

भारतात पहिल्यांदा जागतिक पातळीवरील एक अग्रगण्य कंपनी घेऊन आली, कुक्कुट पालन ,मत्स्य पालन,शेळी पालन,दुध डेअरी यासारख्या संपूर्ण व्यवसायासाठी लागणारे संपूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार अगदी निशुल्क, याच सोबत पशुखाद्य,पिल्ले,औषधी, या सारख्या संपूर्ण goods अतिशय अल्प दरात उपलब्ध ...त्यासाठी संपर्क करा:9175937925 या क्रमांकावर (घरपोच सेवा उपलब्ध).
Gas safety device.
आपके एल.पी.जी गॅस सिलेंडर कि सुरक्षा अब आपके हात 
"सुरक्षित नारी सुरक्षित परिवार"
क्या आप अपने हि घर मे सुरक्षित है ?
दुर्घटना होणे से पहिले सावधानी बरते !
समय कभी बताकर नाही आता....तो इंतजार कीस बात का...
तुरंत मिलीये ..कही देर ना हो जाए !
*कल करेसो आज कर ,आज करे सो अब *
पल मे प्रलय हो जायेगा तो करेंगा कब !
जीवन अनमोल है!और आपका परिवार .........?
विशेषताए...
* सूक्ष्म गॅस लिकेज का परीक्षण.  
* गॅस का परिपूर्ण उपयोय एव गॅस के प्रमाण कि जानकारी गॅस कि बचत अर्थात पैसो की बचत
* किसी कारण होणे वाले गॅस लिकेजपर यह डीवाईस सप्लाई बंद कर देता है. 
आपकी सेफ्टी हि पुरे परीवार कि लाईफ सेफ्टी है..
जो अपने परीवारसे करते है प्यारवह गॅस सुरक्षा यंत्र से कैसे करेंगे इन्कार
तो फिर जल्दी ,आये जल्दी  पाये
संपर्क करे:9175937925,9021527117 
कृपया दिये गये लिंक ओपन करे :  https://youtu.be/IaXlvfNtkpo

शुक्रवार, एप्रिल ०६, २०१८

नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला

नगरसेवकाच्या गाडीवर हल्ला

चंद्रपूर/प्रतिनिधी: 
चंद्रपूर महानगरपालिकेतील बंगाली कॅम्प प्रभाग क्रमांक ४ चे अपक्ष नगरसेवक अजय सरकार यांचे गाडीवर गुरुवारी रात्री अनोळखी इसमांकडून हल्ला करण्यात आला,नगरसेवक अजय सरकार रात्री १२ वाजता आपल्या चारचाकी वाहन MH 34.K.6709 वेर्णा या वाहनांने आपल्या कार्यालयासमोर आले.व आपले वाहन पार्क केले असता,तेथून अर्द्यातासात अनोळखी व्यक्तीने त्यांच्या गाडीच्या मोठ्या दगडाने काचा फोडल्या. हा संपूर्ण प्रकार अजय सरकार यांच्या कार्यालयाबाहेर लागून असलेल्या CCTV कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. या आधी देखील २०११ व २०१५ मध्ये  अजय सरकार यांचेवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याची तक्रार नगरसेवक अजय सरकार यांनी  रामनगर पोलिस ठाण्यात दाखल केली असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहे