Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, एप्रिल १५, २०१८

धंतोलीसह काही भागात सोमवारी वीज बंद

नागपूर /प्रतिनिधी: 
नागपूर मेट्रोला करावयाच्या अत्यावश्यक कामांमुळे महावितरणतर्फ़े सोमवार दि. 16 एप्रिल 2018 रोजी महावितरणच्या कॉग्रेसनगर विभागांतर्गत असलेल्या धंतोली तर महावितरणतर्फ़े करण्यात येणा-या देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी शंकरनगर, धरमपेठ, जयप्रकाशनगर आणि त्यासभोवतालच्या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महावितरण तर्फे  देण्यात आली आहे.
मेट्रोच्या कामांमुळे सोमवारी सकाळी 8 ते दुपारी 11 या वेळेत श्याम पॅलेस, मेडीकल कॉलनी, प्रियंका अपार्टमेंट, हम्पीयार्ड रोड, अजनी रेल्वे स्टेशन, हॉटेल ग्रीन सिटी, शिवाजी सायन्स कॉलेज, हयात एन्क्लेव्ह, ऑल इंडिया रिपोर्टर, कॉंग्रेस नगर, नीलगंगा अपार्टमेंट. धंतोली, छोटी धंतोली या भागातील वीज पुरवठा बंद राहणार असून याचवेळेत यशवंत स्टेडियम, मेहाडीया चौक, शंकरनगर, दंडीगे लेआऊट, काचीपुर, आरसीएफ, खरे टाऊन, धरमपेठचा व भगवाघर लेआऊटचा काही भाग, नागपूर नागरीक रुग्णालय आणि जवळपासच्या परिसरातील वीजपुरवठा महावितरणतर्फ़े केल्या जाणा-या अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे बंद राहील.
याशिवाय सकाळी 7 ते 11 या वेळेत इंद्रप्रस्थ, पाटील लेआउट, भेंडे लेआउट, पन्नासे लेआऊट, एचबी इस्टेट, सोनेगाव वस्ती, सहकारनगर, गजाननधाम, जयप्रकाशनगर, चिंतामणीनगर, राजीवनगर, तपोवन कॉम्प्लेक्स, राहुलनगर, नरकेसरी लेआउट, श्यामनगर, पॅराडाइज सोसायटी या भागातील वीजपुरवठा देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी बंद राहील. 
वीज बंद असल्याची पुर्वसुचना महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या या भागातील वीज ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून देण्यात येणार असून ग्राहकांनी यावेळेत सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे. 


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.