Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, एप्रिल ०९, २०१८

प्रधानमंत्री कौशल्य केंद्रातून युवकांना मिळणार रोजगाराच्या संधी

Employment opportunities for youth from the Prime Minister's Skill Center | प्रधानमंत्री कौशल्य केंद्रातून युवकांना रोजगाराच्या संधीचंद्रपूर/प्रतिनिधी:
 देशातील शिक्षित बेरोजगार युवकांमधील अंगभुत कौशल्यांचा विकास करून त्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी निर्माण करून देण्यासाठी केंद्र शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ तसेच प्रधानमंत्री कौशल्य केंद्राच्या माध्यमातून देशभरात कौशल्यप्राप्त युवकांची उभारणी करीत आहे. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यात केंद्र सरकार वाटचाल करीत आहे. येत्या काळात कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असा विश्वास ना. हंसराज अहीर यांनी केला.
चंद्रपूर येथील बालाजी वॉर्ड परिसरातील बजाज तंत्रानिकेतन महाविद्यालयाजवळील गजानन भवन येथे रविवारे प्रधानमंत्री कौशल्य केंद्राचे उद्घाटन ना. अहीर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, ज्येष्ठ नेते विजय राऊत, जिल्हा सरचिटणीस राहुल सराफ, नगरसेविका संगीता खांडेकर, गजानन मोगरे, रिजनल हेड अक्षय पोहेकर, प्रोजेक्ट डायरेक्टर रितेश पॉल, सेंटरहेड ग्लाडविन अल्फान्सो आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक अक्षय पोहेकर यांनी केले. या प्रधानमंत्री कौशल्य केंद्रात १२० प्रशिक्षणार्थ्यांनी प्रवेश घेतल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.