Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १७, २०१८

चंद्रपूरचा "ताप" वाढला;जगात पहिला नंबर

चंद्रपूर/विशेष प्रतिनिधी:
मध्य महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा शिडकावा होत असतानाच विदर्भात पुन्हा एकदा तापमानाने उसळी घेतली आहे.राज्यासह मुंबईमध्ये उन्हाचा पारा वाढत असतानाच, आता सुरू झालेल्या वैशाख महिन्यामुळे तापमानात आणखी वाढ होणार आहे. विशेष म्हणजे, विदर्भातही सुर्याने आपलं रौद्ररुप दाखवलंय.
चंद्रपुरात सोमवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झालीय. ४४. ७अंश से. हे देशातीलच नव्हे तर जगातील सर्वाधिक तापमान ठरले आहे.चंद्रपुर शहराची राज्यात तापणार शहर अशी ओळख आहे नेहमी एप्रिल आणि मे मध्ये या वाढलेल्या तापमानामुळे जनजीवन प्रभावीत होतय.दरम्यान जागतीक तापमानाची नोंद घेणाऱ्या वर्ल्ड वेदर या संस्थेच्या वेबसाईटवरुनही कालच्या जगातल्या प्रमुख शहरांच्या तापमानाचा उल्लेख करण्यात आलाय. त्यात चंद्रपुरच तापमान जगातल्या सगळया शहरात पहिल्या क्रमांकावर दाखवण्यात आलंय.(18 लो  )

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.