Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, एप्रिल १७, २०१८

बेपत्ता मुलाचा मृतदेह बंद स्विमिंग टँकमध्ये सापडला

बेपत्ता मुलाचा मृतदेह बंद स्विमिंग टँकमध्ये सापडला, हत्या की अपघात ?नागपूर/प्रतिनिधी:
 दोन दिवसांपासून बेपत्ता असणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मृतदेह बिंझानी काॅलेजच्या मागे असलेल्या बंद पडलेल्या स्विमिंग टँकमध्ये सापडल्याने खळबळ उडाली आहे. साहिल खान असं या मुलाचं नाव असून वकीलपेठ मध्ये राहायचा.
शनिवारी साहिल बेपत्ता झाल्याची तक्रार इमामवाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती आणि पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. साहिल आपल्या मित्रासोबत याच बंद पडलेल्या स्विमिग टँक परिसरात खेळायला जात असल्याने त्याचे नातेवाईक शोधत या ठिकाणी आले तेव्हा त्यांना त्यांना या ठिकाणी साहिलचे कपडे दिसले.
पोलिसांना याची माहिती दिल्यावर पोलीस घटनास्थळी आले त्यांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाने साहिलचा मृतदेह या बंद पडलेल्या स्विमिंग टँक मधून शोधून काढला. साहिल पोहतांना बुडुन मृत्यू झालं की यात काही घातपात आहे याचा शोध पोलीस घेताहेत.( लो. से)

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.