चंद्रपूर/प्रतिनिधी:
आदिवासी बहुल, नक्षल प्रभावित परिसरातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प दीनदःुखीत आदिवासींच्या सेवेचे अभुतपुर्व मंदीर आहे.महाराष्ट्रातच नव्हे तर देशात किंबहुना सातासमुद्रा पल्याळ या निष्काम
सेवेचा दरवळ आसमंतात पसरलेला आहे. दारिद्री नारायणांच्या या सेवेलाश्रध्देय बाबा आमटेंच्या कार्यकर्तृत्वाचा परिसस्पर्श आणि प्रेरणेचाअथांग सेवासागर लाभला असल्याने या कार्यापुढे नत्मस्तक व्हावे असे हे महान कार्य पद्यश्री डाॅ. प्रकाश आमटे व त्यांच्या सहचारीणी डाॅ.मंदाकिनी आमटे यांनी उभे केले. हाच तमाम क्षेत्रात कार्यकरणार्यासाठीअनमोल असा आदर्शाचा ठेवा आहे असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्रीना. हंसराज अहीर यांनी लोकबिरादरी प्रकल्पास भेट दिल्या नंतर आपल्याभावना व्यक्त करतांना केले.केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर यांनी नुकतीच या प्रकल्पासभेट देवुन या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवा कार्याची,
शिक्षण, व्यवसाय शिक्षण, स्वास्थ सेवा, मुल्यशिक्षण याबरोबरच येथीलप्राण्यांच्या विविध जाती प्रजातींचे रक्षण, संगोपण व संवर्धन विषयककार्याची डाॅ. प्रकाश आमटे, त्यांचे सहयोगींसोबत या परिसरात फेरफटकामारून पाहणी केली. ना. अहीर यांच्या सोबत गडचिरोलीचे खासदार अशोक नेतेयांची विशेष उपस्थिती होती.
गेली 44 वर्षे व्रतस्थपणे या सेवेला ईशसेवेचे स्वरूप देत लोकबिरादरीनेप्रवाहीपणे जे कार्य लोकांसमोर उभे केले आहे. त्या कार्यास कसलीही तोडनाही. मात्रा या कार्यातून भावी पिढीला आदर्शाचा ठेवा गवसला आहे. व
यातूनच समाज सेवेला समर्पित अशा नवपिढीची उभारणी होईल असा सार्थ विश्वासव्यक्त करतांनाच हेमलकस्यात एका नव्या विश्वाचे दर्शन घडल्याची भावनात्यांनी व्यक्त केली. डाॅ. आमटेंनी अपारंपारिक उर्जेला या ठिकाणीमुर्तरूप दिले आहे. सन 2003 पासुन सौर उर्जेवर शाळा, वस्तीगृह व अन्यउपक्रम चालविले जातात ही बाब सुध्दा सामाजिकदृष्ट्या प्रेरणा देणारी आहे.श्रध्देय बाबांच्या वैश्वीक किर्ती लाभलेल्या समाज सेवेचा निरंतर वारसाआज तिसरी पिढी चालवित आहे. अव्दितीय असे हे सेवाकार्य शब्दांपलिकडचेअसल्याचे ही ना. अहीर यांनी व्यक्त करून अशा पावन स्थळी 20 वर्षांपूर्वीभेट दिली होती असे स्मरण करीत या पवित्रा स्थळी मा. प्रधानमंत्राीनरेंद्र मोदीजी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंहजी तसेच केंद्रीयमंत्री नितीन गडकरीजी यांना भेट देण्याबाबत आग्रह धरू असेही ते म्हणाले.या निस्वार्थ, निष्काम सेवेच्या कर्मस्थळी भेट दिल्याने कृतार्थ वाटते.
असे आमटे कुटूंबीयांशी संवाद सांधतांना सांगीतले.