Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १३, २०१८

अखेर प्रशासनाने हटविल्या होर्डिंग्ज

४00 रुपयाचा दंड केला वसूल
नांदा फाटा :- 
राष्ट्रसंताचा अवमान या मथळा खाली बातमी प्रकाशित होताच नांदा ग्रामपंचायतीचे सचिवांनी अवैध होर्डिंग्ज हटवुन ४०० रुपयाचा दंडही वसुलल्याने होर्डिंग्ज लावणार्‍यावर अपमानित होण्यची पाळी आली.
सविस्तर वृत्त असे की मागील ७/८ वर्षापासून नांदाफाटा येथील ग्रामपंचायतीचे गेटवर राष्ट्रसंतांच्या प्रतिमा समोर विविध राजकीय पक्षाच्या मोठमोठया होर्डिंग्ज लावण्याचा प्रकार सुरु होता. ग्रामपंचायतीच्याच पदाधिकार्‍यांनीच होर्डिंग्ज लावुन राष्ट्रसंतांचा अपमान केल्याने सामाजिक कार्यकर्ता राजु काळे यांनी या प्रकरणाची तक्रार केल्याने याचे वृत्त धडकताच प्रशासनाने होर्डिंग्ज हटविल्याने संताना न्याय मिळाला असे खेदाने सांगावे वाटते. यापुढे गेटवर होर्डिंग्ज लावुन राष्ट्रसंतांचा अवमान करु नये असे मत राजु काळे यांनी आमच्या प्रतिनिधि जवळ व्यक्त केले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.