Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १२, २०१८

वर्धा नदीत बुडून एकाचा मृत्यू

शिरीष उगे/वरोरा
 वरोरा तालुक्यातील वडकेश्वर देवस्थान येथे लग्नाला आलेल्या एका वरडीचा वर्धा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दि. ११ ला दुपारच्या वेळेस घडली. दयालाल कन्नाके वय २५ रा.  साखरा ता वणी येथील रहिवाशी असे या मृताचे नाव आहे.
      वरोरा तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून वडकेश्वर हे देवस्थान वर्धा नदीच्या तीरावर वसलेले आहे. त्या देवस्थानात उन्हाड्यात लग्न समारंभ पार पाडतात. याठिकाणी भाविक लग्नाच्या निमित्याने देवस्थानात भेट देतो आणि लगतच्या वर्धा नदीच्या पात्रात एक पर्यटन स्थळ म्हणून अंघोळ घालतात.  या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी असते.  यातच दि. ११ ला विवाह सोहळा पार पडला आणि त्या सोहड्यातील तीन वराडी वर्धा नदीच्या पाण्याचा आनंद लुटा साठी नदीच्या पात्रात उतरले. परंतु  मार्डा गावानजीक एका खाजगी कंपनीने बंधारा बांधून पाणी अडवून ठेल्याने वर्धा नदीचे पात्र तुडुंब भरून असल्याने पाण्याचा अंदाज न आल्याने पोहायला गेलेल्या तिघा पैकी एक जण परत न आल्याने लग्न मंडपात तारांबळ उडाली आणि शोध शोध सुरू झाली.  या घटनेची तक्रार वरोरा पोलिसांना देताच घटनास्थाडी गाठून शोधा शोध सुरू केली .

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.