Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १९, २०१८

एलबीटीच्या नावे ग्राहकांची फसवणूक;शिवशंकर होंडा विरुद्ध गुन्हा दाखल करा

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीची मागणी चंद्रपूर
चंद्रपुर/प्रतिनिधी:
दुचाकी वाहन कंपनी असलेल्या सुप्रसिद्ध होंडा कंपनीचा चंद्रपुरातील प्रमुख विक्रेता शिवशंकर होंडा यांनी एलबीटीचा नावावर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा आरोप करीत शिवशंकर होंडा विरुद्ध महानगर पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी ने बुधवारी पत्रपरिषदेत केली.
 शिवशंकर होंडा या प्रमुख दुचाकी वाहन विक्रेत्यांनी सण 2012 ते जून 2017 या कालावधीमध्ये एलबीटीची आकारणी केली या कालावधीत ग्राहकांकडून तीन टक्के कर वसूल करण्यात आला मात्र नगरपालिकेला दोन टक्के एलबीटी कराचा भरणा करण्यात आल्याचा आरोप BRSP ने केला आहे.माहितीच्या आधारावर मिळालेल्या माहितीनुसार  शिवशंकर होंडाने सन 2012 ते 2017 या कालावधीत 56 लाख 70 हजार रुपये एलबीटी भरला या कालावधीत सुमारे 19 हजार वाहने विकल्या गेली,याचा सरासरी एलबीटी 2 कोटी 70 लाख रुपयांच्या घरात असताना शिवशंकर होंडाने महानगरपालिकेची शुद्ध फसवणूक केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.शिवशंकर होंडाचे मालक अग्रवाल यांनी महानगर पालिकेतील अधिकारी कर्मचारी तसेच आरटीओ अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा गोरखधंदा सुरू असल्याचा आरोप यांनी केला आहे म्हणजे पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने मागील तारखेच्या असेसमेंट करून बरीच वाहने इकडेतिकडे ट्रान्सफर करण्यात आली. शहरातील काही CA सुद्धा याला जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आले आहे या प्रकरणी महानगरपालिकेने शोरूम मालकाकडून व्याजासह LBT कर वसूल करावा तसेच गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
 पत्रपरिषदेला BRSP चे  विदर्भ महाासचिव  राजू झोडे, मोनल भडके, अजय लिहीतकर, जे डी रामटेके संजय वानखेडे, महेंद्र झाडे, विशाल रंगारी,राजूू रामटेके,गुरू भगत, राजेंद्रर खोब्रागडे, शैलेश निरांजने नितीन कोसनकर आदी उपस्थित होते


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.