Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, एप्रिल १९, २०१८

कठूवा-उन्नाव-व सुरत येथील अमानुष बलात्कार प्रकरणी कॅन्डल मार्च*

कोंढाळी/गजेंद्र डोंगरे:
कठूवा-उन्नाव व सुरत  येथे  झालेल्या अमनवी बलात्कार प्रकरणा चे निषेधार्थ कोंढाळी येथिल सर्व  समाजाच्या युवकांनी येथील शहिद स्मारका पासुन सायंकाळी सात वाजता  संपुर्ण कोंढाळी गावातुन कॅन्डल मार्च काढण्यात आला  .  सर्वानी मिळून काढलेला कॅन्डल मार्च  शहिद स्मारक, बस स्टेशन, चांदनी चौक, राम नगर, उमाठे नगर , एफ सी चैक, राऊत पुरा, टाका देवस्थान, ग्रा.प. शनिवार पेठ,  विठ्ठल मंदिर , राममंदिर,  या मार्गाने  बाजार चौक कोंढाळी पोहचला. बाजार चौकात अनेक युवकांनी कठूवा-उन्नाव-सुरत येथिल अमान विय घटनांचा निषेध व्यक्त करून दोषींना फास्ट ट्रॅक  कोर्टा चे माध्यमातुन खटला चालविण्याची मागणी  एड ऋणूजा गायकवाड यांनी केली  व  सर्वांनी मैन  पाळून  मृतकांना  श्रद्धांजली वाहन्यात आली. शेवटी राष्ट्रगीता नंतर  कार्यक्रम समपन्न झाला.  या प्रसंगी ठाणेदार अहिरकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.  हे आयोजन मैत्री दल कोंढाळी कडून करण्यात आले होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.