Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, एप्रिल १३, २०१८

राहुल पावडे पुन्हा स्थायी समिती सभापती पदावर


चंद्रपूर/प्रतिनिधी:
नुकतीच स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक पार पडली यात भाजपचे राहुल पावडे यांची स्थायी समिती सभापती म्हणून बिनविरोध फेरनिवड करण्यात आली तर झोन क्रमांक सभापती म्हणून भाजपच्या माया उइके  आणि दोन मध्ये भाजपचे शाम कनकम अविरोध आलेत तर झोन क्रमांक तीनच्या सभापती पदासाठी निवडणूक झाली यात बसपा काँग्रेस आणि शहर विकास आघाडीच्या संगीता भोयर यांचा पराभव करून भाजप समर्पित अजय सरकार विजयी झाले या निवडणुकीदरम्यान बसपा नगरसेवकांमध्ये शाब्दिक बाचाबाची ही पहायला मिळाली. पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक म्हणून राहुल पावडे ओळखले जातात स्थायी समिती सभापतीपदासाठी राहुल पावडे यांचेच  एकमेव नामांकन होते भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्याने विरोधकांनी या निवडणुकीत कुणाचेही नामांकन दाखल केले नाही त्यामुळे पावडे यांची अविरोध निवड करण्यात आली त्याचप्रमाणे झोन क्रमांक 1 व 2 मध्ये ही अनुक्रमे भाजपच्या माया उईके व शम कनकम यांचेच नामांकन होते त्यामुळे यांची अविरोध निवड झाली 3 मध्ये काँग्रेसच्या संगीता भोयर  आणि भाजप व मित्रपक्षांच्या अजय सरकार यांच्यात निवडणूक झाली असे सरकार यांना करा तर भोयर यांना 9 मते मिळाली बसपचे बंटी परचाके पितांबर कश्यप आणि राजलक्ष्मी   कारंगल   हे तीन नगरसेवक अनुपस्थित होते त्याचा फायदा सरकार यांना झाला निवडणूक आटोपताच नगरसेवक कश्यप सभागृहात दाखल झाले तेव्हा गटनेता अनिल रामटेके ,प्रदीप डे व अन्य नगरसेवकांनी कश्यप यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला तर आर्थिक देवाणघेवाण करून बसपा नगरसेवकांनी अनुपस्थित राहिल्याचे गंभीर आरोप काँग्रेसच्या उमेदवार संगीता भोयर यांनी केला

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.