रामटेक ( तालूका प्रतिनीधी):
पेंच व्याघ्र प्रकल्पातील पुर्व पेंच वनपरिक्षेञातील गाभा क्षेञात वाघाच्या चार महीने वयाच्या छावाचा मृतदेह आढळुन अाल्याने प्रकल्प व्यवस्थापनात चांगलीच खळबळ उडाली .
हा छावा काही दिवसांपूर्वी गस्तीवरील वनकर्मचार्यांना एकांतात दिसुन अाला होता. आईने त्याला सोडल्याने अशक्त होऊन अंत झाल्याची चर्चा अाहे .या छावाच्या मृत्यूने माञ पेंच व्याघ्र प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
माञ , राञी उशिरा प्राप्त झालेल्या वनविभागाच्या प्रसिध्दीपञानुसार हा छावा आईपासून वेगळा झाला होता . तो खात पित नव्हता त्याला खाद्यान्न पुरविण्यात अाले .हालचाली व्यवस्थित होत्या .परंतु ९ मार्चनतंर त्याची हालचाल थांबली आॅनकॅमेरा वनाधिकारी , कर्मचार्यांनी राबविण्यात अालेल्या या मोहिमेनंतर तो मृत अाढळल्या अाजुबाजूच्या परिसरात काही गायींचाही मृत्यू झाल्याचे दिसले . हा छावा मध्य प्रदेशातील एका वाघिणीचा असल्याची नोंद मिळाली अाहे .चालू वर्षांच्या सुरुवातीच्या अवघ्या दोन महिन्यातच तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आलीय. यानंतर वाघ स्थलांतरासाठी ठोस निर्णय आवश्यक असल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे. देशात वाघ मृत्यूची पुढे आलेली ताजी आकडेवारी वन्यजीवप्रेमींच्या चिंता वाढविणारी ठरली आहे. देशभर मागील दशकात 'वाघ वाचवा' अभियान धडाक्यात राबविण्यात आले. त्याची फळे पुढे येत असतानाच आता मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तराखंड राज्यातून पहिल्या दोन महिन्यात वाघ मृत्यूची आणि अवयव गवासल्याची आकडेवारी धोक्याचा इशारा समजली जात आहे.
SHARE THIS